सोलापूर

Modi in Solapur : PMआवास योजनेअंतर्गत असंघटित कामगारांसाठी तब्बल ३० हजार घरे; १५ हजार घरांची कामे कधीपर्यंत पूर्ण होणार ?

प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण व्हायला चार वर्षांचा कालवधी लागला आहे. दुसऱ्या टप्प्यातील १५ हजार घरांची कामे कधीपर्यंत पूर्ण होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत कुंभारी परिसरातील रे-नगर येथे असंघटित कामगारांसाठी तब्बल ३० हजार घरे बांधली जात आहेत. प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण व्हायला चार वर्षांचा कालवधी लागला आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील १५ हजार घरांची कामे कधीपर्यंत पूर्ण होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, एका वर्षात उर्वरित घरे पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे ‘म्हाडा’च्या अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना स्पष्ट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ जानेवारी २०१९ रोजी सोलापुरातील भारतरत्न इंदिरा गांधी पार्क स्टेडिअमवरील कार्यक्रमावेळी रे-नगर प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ केला होता. देशातील हा पहिलाच मोठा प्रकल्प असल्याने स्वत: पंतप्रधानांनी त्याबाबतीत विशेष लक्ष घातले होते. त्यामुळे प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम १९ जानेवारी २०२३ रोजी पूर्ण झाले.

आता त्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण उद्या (शुक्रवारी) पंतप्रधानांच्याच हस्ते होत आहे. पण, रे-नगर प्रकल्पातील उर्वरित १५ हजार लाभार्थींना कधीपर्यंत घरे मिळणार, याकडेही लक्ष द्यावे लागणार आहे. लाभार्थींनाही त्याची प्रतीक्षा आहे. राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून उर्वरित प्रकल्पासाठी वेळेत निधी मिळावा एवढीच लाभार्थींना अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kedgaon Crime : केडगावातील गर्भलिंग निदान रॅकेटची व्याप्ती मोठी; दोघेजण अद्याप फरार, आणखी काहींचा सहभाग असण्याची शक्यता

Abdul Sattar: अब्दुल सत्तारांची नाराजी दूर, मुलाचा उमेदवारी अर्ज उद्या माघारी घेणार

Donald Trump: मोज्तबा खामेनेई यांची भेट घेण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा; नेतन्याहू यांच्याशी वादावादीनंतर ट्रम्प यांचा भलताच प्लॅन

Pune Toxic Liquor Case: विषारी दारूसाठी रसायन पुरविणाऱ्या पिता-पुत्राला नवी मुंबईतून अटक; तपासासाठी दहा पथके

Lowest Price Electric Scooter : 50 हजारपेक्षा कमी किंमतीत इलेक्ट्रिक स्कूटर; सगळ्यात स्वस्त आहेत 'या' 3 गाड्या, दमदार रेंज

SCROLL FOR NEXT