Ankita Patil sakal
सोलापूर

Ankita Patil : 'आष्टी शुगर' कारखान्यास प्रतिदिन साडेसात हजार मेट्रीक टन ऊस गाळपास परवानगी

'आष्टी शुगर' या साखर कारखान्यास प्रतिदिन साडेसात हजार मेट्रीक टन गाळपासाठी केंद्र शासनाने नुकतीच मंजुरी दिली.

राजकुमार शहा

मोहोळ - आष्टी, ता. मोहोळ येथील 'आष्टी शुगर' या साखर कारखान्यास प्रतिदिन साडेसात हजार मेट्रीक टन गाळपासाठी केंद्र शासनाने नुकतीच मंजुरी दिली असून, चालू गळीत हंगामात कारखान्याने साडेपाच लाख मेट्रीक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असल्याची माहिती या कारखान्याच्या अध्यक्षा अंकिता पाटील यांनी दिली. यामुळे शेतकऱ्यांचा ऊस वेळेत गाळप होणार आहे.

या संदर्भात कारखान्याचे जनरल मॅनेजर संजीव गुरव यांनी दिलेल्या माहिती नुसार, आष्टी शुगर हा कारखाना यापूर्वी प्रतिदिन अडीच हजार मेट्रीक टन उसाचे गाळप करत होता. शेतकऱ्यांना वेळेत दिलेली ऊसाची एफ आर पी, अचूक वजन काटा यामुळे ऊसाची उपलब्धता वाढली आहे.

त्यामुळे कारखान्याने ज्यादा गाळपासाठी शासनाकडे परवानगी मागितली होती. त्यास मंजुरी मिळाली आहे. कारखान्यात सध्या दहा मेगॅवॅट वीज निर्मिती प्रकल्प कार्यान्वित असून, कारखाना लवकरच असावनी प्रकल्प हाती घेणार आहे.

चालू गळीत हंगामासाठी कारखाना सज्ज झाला असून, कारखान्याकडे चालू गळीत हंगामासाठी साडेबारा हजार हेक्टर उसाची नोंद आहे. ऊस वाहतुकीसाठी कारखान्याने 225 ट्रॅक्टर, 175 मिनी ट्रॅक्टर, 325 बैलगाड्या, यांच्या बरोबर करार केला आहे. ऊस तोडणी यंत्रणेला आगाऊ रकमेचे वाटपही केले आहे.

शेतकऱ्याचा ऊस कारखान्याला किती आला यापेक्षा एकरी त्याचे उत्पादन कसे वाढवावे यासाठी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असून त्यात तज्ञ शास्त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. दरम्यान काही नागरीकांनी हा कारखाना विकला असल्याची अफवा पसरवली आहे, त्यात तथ्य नसल्याचे गुरव यांनी सांगितले.

यावेळी जनरल मॅनेजर गुरव यांच्यासह चीफ अकौटंट तुकाराम देवकते, मुख्य अभियंता दीपक कळसाईत, चिफ केमिस्ट रामचंद्र समुद्रे, शेती अधिकारी दीपक खटके उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fifa World Cup 2026 : ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावाची फक्त 'हवा'! बलाढ्य पोर्तुगालला ५२ वर्षांनी वर्ल्ड कप खेळणाऱ्या काँगोने रडवले, धक्कादायक निकाल

T20 WC: धक्कादायक! भारताच्या प्रमुख खेळाडूला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले... सर्व खेळाडू तिच्याभवती जमले, चिंता वाढवणारी घटना

Monsoon Tourism: पावसाने दडी मारताच ताम्हिणी घाट-देवकुंड पर्यटन ठप्प; अंधारबन, खजिना ट्रेकवर शुकशुकाट

Donald Trump: ''नरेंद्र मोदी पंतप्रधान असेपर्यंत भारतावर हल्ला झाला तर..'', डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान अन् जगभरातील नेत्यांच्या भूवया उंचावल्या

‘बी-२’चा ‘जीआर’ महिनाभरात! सोलापुरातील १२५ वर्षे जुन्या चाळींमधील प्रत्येक कुटुंबास मिळणार काही हजारांत जागेची मालकी; आमदार देवेंद्र कोठेंचा यशस्वी पाठपुरावा

SCROLL FOR NEXT