Ankita Patil sakal
सोलापूर

Ashti Sugar Factory : 'आष्टी शुगर' साखर कारखान्याने केला 2 हजार 700 रुपये प्रति टन दर जाहीर

सोलापुर जिल्ह्यात 'आष्टी शुगर' साखर कारखान्याने गाळपास येणाऱ्या उसाला दिला उच्चांकी दर.

राजकुमार शहा

मोहोळ - आष्टी, ता. मोहोळ येथील 'आष्टी शुगर' या साखर कारखान्याने गाळप हंगाम 2023/24 मध्ये गाळपास येणाऱ्या उसाला 2 हजार 700 रुपये प्रति टन दर जाहीर केल्याची माहिती कारखान्याच्या अध्यक्षा अंकिता पाटील-ठाकरे यांनी दिली. हा दर जिल्ह्यात उच्चांकी आहे.

या दरामुळे पावसा अभावी उसाच्या वजनात घट जरी झाली असली तरी गाळपास जाणाऱ्या उसाचे पैसे होणार आहेत. आर्थिक अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

चालू वर्षी पावसाळा पूर्णपणे कोरडा गेला आहे. त्यामुळे उसाची वाढच झाली नाही. परिणामी उसाच्या वजनात मोठी घट झाली आहे. शेतकऱ्यांच्या मागे कायमच संकटांची मालिका असते. जिल्ह्यात उसाची उपलब्धता नेहमीपेक्षा कमी आहे. त्या पार्श्वभूमीवर ऊस दराची स्पर्धा व्हावयास पाहिजे असे वातावरण आहे, मात्र तसे होताना दिसत नाही. आष्टी शुगर या साखर कारखान्याने गेल्या गाळात हंगामात उसाला प्रति टन 2 हजार 300 रुपये दर दिला आहे.

सध्या बाजारपेठेत साखरेचे दर वाढले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उसाला जादा दर देण्यास काही हरकत नाही. तसेच अपवाद वगळता अनेक साखर कारखान्याकडे उपपदार्थ निर्मिती आहे. अडचणीतील शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी आष्टी शुगर ने हा दराचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांमधून याचे स्वागत होत आहे. चालू गाळप हंगामात चार लाख मेट्रीक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे.

यावेळी कारखान्याच्या अध्यक्षा अंकिता पाटील-ठाकरे, कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, संचालिका भाग्यश्री पाटील, संचालक राजवर्धन पाटील, जनरल मॅनेजर संजीव गुरव, मुख्य अभियंता दीपक कळसाईत, चिफ केमिस्ट रामचंद्र समुद्रे, चीफ अकाउंटंट तुकाराम देवकते, शेती अधिकारी दीपक खटके, स्टोअर कीपर एस आर घाडगे व अन्य कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi ला संधीची वाट का पाहावी लागतेय? श्रेयस अय्यरने खरं कारण सांगितलं; म्हणाला, 'वेळ आली की तो राज्य करेल'

राहू येथे सलग दुसऱ्या दिवशी दुसरा बिबट्या जेरबंद; साडेचार वर्षांची मादी पिंजऱ्यात अडकल्याने नागरिकांमधे दहशत

Condom Company Stock: कंडोम बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरचा धमाका; सहा महिन्यांत २५७% वाढ, गुंतवणूकदार मालामाल

भातपीकाचे आगार धोक्यात; राजगड तालुक्यातील बहुतांशी भात खाचरे कोरडी, शेतकरी चिंतेत

Latest Marathi News Live Update : पंजाबमध्ये माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या

SCROLL FOR NEXT