RAID sakal
सोलापूर

बार्शीत सावकाराच्या सराफा दुकानावर सहायक निबंधकांच्या पथकांचा छापा!

कोरे धनादेश, सह्या केलेल्या कोऱ्या पावत्या, खरेदी खते जप्त

प्रशांत काळे

बार्शी (सोलापूर) : सावकारी करणाऱ्या बार्शीतील सराफी दुकानावर सहायक निबंधकांच्या पथकाने छापा टाकून ऋणकोंचे कोरे धनादेश,खरेदी खते, स्वाक्षऱ्या असलेल्या कोऱ्या पावत्या तसेच सावकारकीच्या नोंदवह्या जप्त केल्या असून जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शीचे सहायक निबंधक अमोल निरडे यांच्या पथकाने कारवाई केली.या घटनेने शहरातील अवैध सावकारी करणारांचे धाबे दणाणले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशीशी की,गणिता गव्हाणे यांनी अवैध सावकारी विरोधात तक्रार दाखल केली होती.परांडा तालुक्यातील रोसा येथील गव्हाणे यांचे वडील सखाराम बनसोडे यांनी सर्व्हे नंबर ३७ मधील काही जमीन सावकार अशोक लंगोटे (रा.उपळाई ता. बार्शी)व झाकीर पटेल यांना गहाणखत करून देवून व्याजाने पैसे घेतले होते.सावकारास पैसे परत करूनही जमीन परत देत नसल्याने मुलगी गणिता यांनी परांडा येथील सहायक निबंधक कार्यालयात 19 नोव्हेंबर रोजी तसेच बार्शीतही सहायक निंबधक यांच्याकडे तक्रार दिली होती.

तक्रार अर्जाच्या अनुषंगाने लंगोटे याच्या बार्शी,उपळाई ठोंगे व परांडा येथील मालमत्तावर एकाच वेळी छापे टाकून कारवाई करण्यात आली.लोखंड गल्ली येथील श्री ज्वेलर्स या दुकानी सहायक निबंधक अमोल निरडे यांच्या पथकाने छापा टाकला.

पथकात सहायक सहकार अधिकारी सचित महाडिक यांच्यासह कर्मचाऱ्यांचा समावेश होता तर लंगोटे याच्या उपळाई ठो येथील घरी मनीषा गुप्ता यांच्या पथकाने छापा टाकला छाप्यात कोरे धनादेश,खरेदी खते,कोऱ्या पावत्या व नोंदवह्या जप्त करण्यात आल्या.

जप्त केलेल्या दस्त ऐवजांची पुढील चौकशी सहायक निबंधक यांच्यामार्फत सुरू आहे अवैध सावकारीने पीडित असणारांनी तक्रारीसाठी पुढे यावे असे आवाहन सहायक निबंधक अमोल निरडे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara DJ Dolby Action : पोलिसांची कारवाई चुकीचीच! साताऱ्यात डीजे जप्त झाल्यानंतर उदयनराजेंनी थेट घेतली डॉल्बी चालकांची बाजू; पालकमंत्री देसाईंची भूमिका काय?

‘आईला सोडून कसा जाऊ? आधी तिला बाहेर काढतो’... शेवटपर्यंत झुंजला, अखेर बस आगीत माय-लेकाचा मृत्यू; अंगठीवरून पटली ओळख

Lalbaugcha Raja Visarjan 2026 : लालबागच्या राजाच्या विसर्जनाला यंदाही होणार विलंब? गिरगाव चौपाटीवरील 'त्या' नैसर्गिक कारणामुळे वाढली चिंता; प्रशासनासमोर मोठं आव्हान

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात गणपती विसर्जन मिरवणुकीत सतेज पाटलांनी डीजेच्या तालावर धरला ठेका; व्हिडिओ व्हायरल

‘तुम्हाला काय प्रॉब्लेम?’ सततच्या चर्चांवर गोविंदांचा सवाल; म्हणाला...‘माझ्या खासगी आयुष्याचा तमाशा करू नका’

SCROLL FOR NEXT