'चंद्रकांतदादांनी संयम राखला असता तर शिवसेनेचे 56 आमदार भाजपसोबत गेले असते' Canva
सोलापूर

'चंद्रकांतदादांनी संयम राखला असता तर शिवसेनेचे आमदार भाजपसोबत गेले असते'

'चंद्रकांतदादांनी संयम राखला असता तर शिवसेनेचे 56 आमदार भाजपसोबत गेले असते'

भारत नागणे - सकाळ वृत्तसेवा

मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज (गुरुवारी) पंढरपूर येथे श्री विठ्ठल - रुक्‍मिणीचे दर्शन घेतले.

पंढरपूर (सोलापूर) : भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) सतत काही ना काही टीका करत असतात. त्याच वेळेस ते संयमाने वागले असते तर त्यांच्यासोबत शिवसेनेचे (Shivsena) 56 आमदार दिसले असते, असा टोला राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी लगावला. मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज (गुरुवारी) पंढरपूर (Pandharpur) येथे श्री विठ्ठल - रुक्‍मिणीचे दर्शन घेतले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना भाजप नेते चंद्रकांत पाटलांवर त्यांनी टीका केली.

कोरोनाचे संकट कमी झाले आहे. असेच संकट कमी होऊ दे, असे आपण श्री विठ्ठल - रुक्‍मिणी चरणी साकडं घातल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी दहा हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे; मात्र हे पॅकेज शेतकऱ्यांना अपुरे असल्याची खंतही पाटील यांनी या वेळी व्यक्त केली. भाजपमधून शिवसेनेत आलेले अनेक नगरसेवक पुन्हा भाजपमध्ये निघाले आहेत, याविषयी मंत्री पाटील यांना विचारले असता, भाजप त्यांना अपात्रतेची भीती दाखवत असल्याचा आरोप केला.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर टीका करणे म्हणजे उंदराने काहीतरी चिंधी पकडणे अशी टीकाही मंत्री पाटील यांनी भाजपवर केली आहे. या वेळी पंढरपूर विभागाचे शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, धनाजी काळे, सुधीर अभंगराव, शहर शिवसेनेचे अध्यक्ष रवी मुळे, पाणीपुरवठा विभागाचे अभियंता यू. बी. माशाळे, शाखा अभियंता श्रीराम दामोदरे आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolkata Stamped: कोलकात्यात दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी; १७ भाविकांचा मृत्यू

IND vs WI 5th T20I: भारत-वेस्ट इंडिज पाचव्या सामन्याचा निकाल लागला... ९-९ षटकांचा सामना नेमका कुणी जिंकला?

Resort Fire Tragedy : पर्यटकांच्या रिसॉर्टला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांसह १० पर्यटकांचा होरपळून मृत्यू, ९ गंभीर!

Couple Found Dead: पत्नीच्या वाढदिवशीच 'त्या' दोघांनी संपविले जीवन; 'आम्ही जग सोडतोय...!' कोणाला पाठवला ईमेल?

IND vs WI 5th T20I: इशान किशनचे वादळ, मोडला विक्रम; भारताने ९ षटकांच्या मॅचमध्ये किती धावा केल्या? पावसाने पुन्हा घोळ घातला

SCROLL FOR NEXT