Mangalwedha Crime Sakal
सोलापूर

Mangalwedha Crime : दिव्यांग महिलेवर अत्याचार, आरोपीच्या अटकेसाठी आंदोलनाचा प्रहारचा इशारा

मंगळवेढा तालुक्यात दिव्यांग तरूणीवर दोघांनी अत्याचार केला. दरम्यान गावकऱ्यांनी त्यांना चोप दिल्याने पळून गेले.

हुकूम मुलाणी ​

मंगळवेढा - तालुक्यात दिव्यांग तरूणीवर दोघांनी अत्याचार केला. दरम्यान गावकऱ्यांनी त्यांना चोप दिल्याने पळून गेले. त्या घटनेनंतर पिडीताच्या नातेवाईकांनी गुन्हा दाखल केला. परंतु आरोपी अद्याप सापडले नाहीत. आरोपीना अटक करा अन्यथा उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयासमोर दिव्यांगा समवेत आंदोलन करू असा इशारा प्रहारने दिला.

याबाबतचे निवेदन पोलीस अधिकारी रेवण धमाळे यांना दिले. यावेळी प्रहार अपंग क्रांतीचे जिल्हा उपाध्यक्ष सिदराया माळी, प्रहार जनशक्तीचे तालुकाध्यक्ष राकेश पाटील, तालुकाध्यक्ष समाधान हेंबाडे, संपर्कप्रमुख शकील खाटीक, शशिकांत पवार, संतोष यादव, सोमनाथ हेगडे, भीमाशंकर चोरडे, आदी उपस्थित होते.

याबाबत माहिती अशी,पिडीत तरूणीची आई दवाखान्याला गेल्यामुळे दवाखान्यातील उपचारानंतर मुलाकडेच थांबल्याने पिडीत दिव्यांग तरूणी एकटीच असल्याने गावातील पिलक्या नबी खाटीक, इब्राम अलीसाब मुलाणी दोघांनी अत्याचार केला. दोघाविरोधात गुन्हा दाखल केला असला तरी आरोपीना अद्याप अटक झाली नसल्याने प्रहार संघटनेने नाराजी व्यक्त केली.

पोलीसाचा तपास सुरू असला नराधम सध्या गावाच्या शिवारात फिरत आहेत अशी चर्चा असल्याने गावकऱ्यांनी पोलिसांना मदत करणे गरजेचे आहे. प्रहारच्या माध्यमातून पोलिसांना मदत करून त्यांना अटक केल्याशिवाय शांत बसणार नाही व पिडीतेला प्रहार संघटना न्याय मिळवून देणार असल्याचे निवेदनात नमूद केले.

जोपर्यंत त्या नराधमांना शिक्षा होत नाही तोपर्यंत प्रहार शांत बसणार नाही. त्या दिव्यांग भगिनींच्या पाठीशी ठामपणे उभे राहू. आ. बच्चू कडू यांच्याशी संपर्क झाला असून, त्यांनी पोलीस तपासाबाबत विचारणा केली.

- समाधान हेंबाडे, तालुकाध्यक्ष प्रहार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Monsoon: पावसाचा ११९ वर्षांचा विक्रम, पुणे शहरात जुलैमध्ये ५२६ मिलिमीटर पावसाची नोंद

Ichalkaranji Municipal Commissioner : इचलकरंजीत आयुक्तांच्या बदलीवरून संघर्ष; भाजपमधील आवाडे-हाळवणकर गटात वाद पेटण्याची चिन्हे, CM फडणवीसांची मागितली वेळ

Commonwealth Games 2026: एका माजी गोलंदाजाने नीरज चोप्राला भालाफेकीत हरवले; CWG मध्ये गोल्ड जिंकणारा तो कोण?

Latest Marathi News Live Update : अमित शहांचा पुणे दौरा, आंदोलनाआधी काँग्रेस कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

Abhijeet Dipke on Jai Bhim : 'जय भीम' हा नारा केवळ एका समाजाचा नाही; अभिजीत दिपके यांचे वक्तव्य, 'ब्लॅक अँड व्हाईट'मध्ये अनेक खुलासे

SCROLL FOR NEXT