logo 
सोलापूर

सोलापूरचे पालक सचिव अतुल पाटणे म्हणाले...रोजगाराचा प्रश्‍न सोडविण्यासाठी उपाययोजना करा 

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूर शहरातील यंत्रमाग व विडी उद्योग सुरू करण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घ्या. विडी कामगारांना घरपोच कच्चामाल पुरवठा करता येतो का? यंत्रमाग कामगारांना कारखान्यात ने-आण करण्याकरिता बस ठरवून योग्य ती खबरदारी घेत औद्योगिक प्रकल्प सुरू करता येते का हे पाहावे. सोलापुरात स्थलांतरित मजूर व नागरिकांची संख्या वाढली आहे. भविष्यात त्यांना रोजगाराची आवश्‍यकता आहे. त्यासाठीही औद्योगिक प्रकल्प सुरू होणे आवश्‍यक असून रोजगाराचा प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना सोलापूरचे पालक सचिव अतुल पाटणे यांनी केल्या. 

सोलापूर शहर व जिल्ह्यात पावसाळ्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावीपणे उपाययोजना राबविण्याच्या सूचनाही पालक सचिव पाटणे यांनी आज (शुक्रवारी) जिल्हा प्रशासनाला केल्या. पालक सचिव पाटणे यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर, पोलिस अधीक्षक मनोज पाटील, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांच्याशी व्हीसीद्वारे संवाद साधला. 

पाटणे म्हणाले, ""शहरात तसेच ग्रामीण भागात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाकडून प्रभावीपणे पावले उचलणे अपेक्षित आहे. आता नागरिक घराबाहेर पडतील. दुकाने सुरू होतील. त्यात पावसाळा सुरू होत असल्याने वेळीच दक्षता घेऊन संभाव्य धोका टाळण्यासाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवा. नागरिकांनी कोरोनासंदर्भात योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे, यासाठी विशिष्ट कार्यक्रम हाती घ्या.'' सरकारी रुग्णालयांवर ताण पडत असल्याने खासगी दवाखाने कोविड, नॉन कोविड उपचारासाठी अधिग्रहित करण्याच्या सूचनाही त्यांनी या वेळी केल्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वायचळ, पोलिस आयुक्त शिंदे यांनी आपल्या ऑफिसमधून व्हीसीमध्ये सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Job: एकाच पदासाठी वेगवेगळ्या परीक्षा नको, शुल्कही वाचणार! मंत्री शेलार यांची विधानसभेत माहिती

Mobile App to Predict Cancer Risk: कर्करोगाचा अंदाज आता मोबाईलवर! टाटा रुग्णालयातील संशोधकांची निर्मिती; जोखमीचे मूल्यांकन शक्य

Pune University flyover: पुण्यातील विद्यापीठ चौकाच्या उड्डाणपुलावरुन जाताना उडतोय गोंधळ; अर्धवट कामामुळे अपघाताचा धोका

उन्हाचा तडाखा वाढला! दिवसभरात प्या ४ लिटर पाणी, जिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष, नागरिकांनी लहान मुलांची, ज्येष्ठांची कशी घ्यावी काळजी? वाचा...

Akola News : टी-२० विजयाच्या जल्लोषानंतर अकोल्यात तणाव; दोन गटात वादः वाहनांची तोडफोड, दगडफेकीत नुकसान

SCROLL FOR NEXT