supriya more2.jpg 
सोलापूर

बाबांचा रिक्षा मुलांनी आईला शिकवला अन संपला निराशेचा अंधार

अनुराग सुतकर

सोलापूर ः धैर्य, जिद्द, चिकाटी आणि लढण्याची हिंमत जर असेल तर कोणत्याही परिस्थितीचा सामना करत सुखाचे आणि समृद्धीचे जीवन पुन्हा स्वाभिमानाने जगता येते हे एक महिलाच करू शकते. सोलापुरातील अशीच एक महिला की जीने आपल्या पतीच्या निधनानंतर न खचता मुलांच्या मदतीने ऍटोरिक्षा शिकत कुंटुबाला स्वावलंबी बनविले. 
सुप्रिया मोरे या सध्या महिला रिक्षाचालकाची कहाणी अशी वेगळी आहे. 
पतीचे निधन 2018 मध्ये झाले. त्यांचे पती रिक्षाचालक होते. सुप्रिया यांच्यासमोर सर्वात मोठा प्रश्न होता की पतीच्या निधनानंतर दोन्ही मुलांचं संगोपन कसं करावं ? आणि काहीतरी सुरू करायचं म्हणलं तर तीतकं आर्थिक भांडवल देखील आपल्याकडे उपलब्ध नाही. मग त्यांनी विचार केला की पतीने रिक्षामध्ये आपली गुंतवणूक करून आपला प्रपंच चालवला आहे. तर आपणही रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचे संगोपन केले पाहिजे. त्यानंतर त्यांनी आपल्या भावाकडून रिक्षा कशी चालवावी व चालकाचा समतोल कसा असावा हे शिकले. त्यानंतर रिक्षाचे लायसन्स काढले. पण अडचण एकच होती की रिक्षा शिकली पण शहरातील रस्ते माहिती नव्हते. 
तेव्हा त्यांना त्यांच्या मुलांची साथ मिळाली त्यांच्या मुलांनी त्यांना रस्ते दाखवले. त्यांच्या जीवनाला मार्ग मिळाला कारण पुढे तेच आपल्या आईला सांगु लागले की "आई आता दुसरा गियर टाक, आता वेग कमी कर, कारण त्या लेकरांनी वडिलांना रिक्षा चालवताना पाहिले होते. एवढेच नाही तर कोरोनाच्या काळातसुद्धा सुप्रियांनी त्यांचा व्यवसाय तसाच चालु ठेवला. आज ते लक्ष्मी मार्केट ते भैय्या चौक परिसरात रिक्षा चालवतात. एवढंच नव्हे तर त्या घरीच साड्या पिकोफॉल करणे, लोकरीचे कपडे विणणे, कुरवड्या-पापड्या करणे, शोभेच्या वस्तू बनविणे असे कौशल्यावर आधारित सर्वच कामे करतात. त्यातुन त्यांना उत्पन्न ही मिळते. त्यातुनच ते मुलांचे शिक्षण, संसार आणि आपल्या सासुंचा देखील सांभाळ करत आहेत. 


 हा मार्ग मी स्वतः निवडला
पती हयात होते तेव्हा कोणत्याही गोष्टींची कमी नव्हती . परंतु ते गेल्यावर मी ठरवले की आपल्या लेकरांना कधीच त्यांच्या वडिलांची कमी भासु नये . हा मार्ग मी स्वतः निवडला त्यामुळे मी यात यशस्वी होणारच हि इच्छाशक्ती कधीच कमी होऊ दिली नाही. त्यासाठी माझी लेकरे, सासु, मामा आणि बहिणींनी नेहमी मला प्रोत्साहन दिले. 
- सुप्रिया मोरे 

 मुलाप्रमाणेच आमचा सांभाळ करत आहे
मला नेहमी वाटायचं की माझ्या सुनेला गाडी पण येत नाही. शिवाय समाज काय म्हणेल ? परंतु तीच्या इच्छाशक्ती समोर आम्हा सर्वांना झुकावेच लागले. आता ती माझ्या मुलाप्रमाणेच आमचा सांभाळ करत आहे. 
- विमल मोरे ( सुप्रिया यांच्या सासुबाई ) 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mani Shankar Aiyar : ‘’मी गांधीवादी, नेहरूवादी, राजीववादी आहे, पण राहुलवादी नाही’’ ; काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर थेटच बोलले..!

Pune Shivjayanti : रस्त्याच्या कामामुळे शिवजयंती मिरवणूक मार्गात बदल; महापौरांचे आदेश

भिवडी येथे कारखान्यात भीषण स्फोट; सात ठार, बेकायदा फटाके निर्मिती सुरू असल्याचा दावा

Pune Crime : पोलिसांकडून आंतरराज्यीय टोळी उद्ध्वस्त, सव्वाचार कोटींचे मेफेड्रोन जप्त

Latest Marathi News Update : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT