सोलापूर

कोरोना रुग्ण आढळल्याने बार्डी हादरले 

सकाळ वृत्तसेवा

करकंब (सोलापूर) : येथील कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या बार्डीतील (ता. पंढरपूर) एकाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने बार्डी गावात भीतीचे वातावरण पसरले होते. दरम्यान, या रुग्णाच्या थेट संपर्कातील 28 जणांना ताब्यात घेऊन संस्थात्मक विलगीकरणासाठी पंढरपूरला पाठविले आहे. 

चार दिवसांपूर्वी पुण्यावरून आला 
चार दिवसांपूर्वी पुण्यावरून आलेला करकंब येथील एकजण कोरोनाबाधित आढळला होता. त्याच्या थेट संपर्कात आलेल्या करकंब आणि बार्डी येथील नातेवाईक असे एकूण 39 जणांचे संस्थात्मक विलगीकरण करून तपासणीसाठी स्वॅब पाठविले होते. त्यांचे अहवाल आज प्राप्त झाल्यानंतर यात 38 जणांचा निगेटिव्ह तर बार्डीतील एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे निष्पन्न झाले. 

गाव बंद ठेवण्याची सूचना 
तातडीने गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बोधले, करकंब ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार सरवदे, डॉ. साखरे, सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत पाटील आदींनी बार्डीला भेट देऊन गाव पूर्ण बंद ठेवण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनास दिल्या आहेत. त्यानंतर नवीन रुग्णाच्या थेट संपर्कात आलेल्या बार्डीतील 26 व करकंबमधील दोन जणांना संस्थात्मक विलगीकरणासाठी पंढरपूरला पाठविले असल्याची माहिती डॉ. साखरे यांनी दिली. 

धोका वाढला 
कोरोनाबाधित रुग्णाच्या थेट संपर्कात बार्डीतील तीन किराणा दुकानदार, एक दूधवाला, दुचाकीवर लिफ्ट दिलेले दोन जण असल्याने आता पुढे काय होणार, या धास्तीने ग्रामस्थ हादरून गेले आहेत. शिवाय, या रुग्णास दारूचे व्यसन असल्याने तो करकंब येथे दोन ठिकाणी जावून आला होता. या दोन्ही ठिकाणच्या मद्यविक्रेत्यांनाही आज संस्थात्मक विलगीकरणासाठी ताब्यात घेतले असून या दोन्ही ठिकाणी अवैध दारू विक्री केली जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे लॉकडाउनच्या काळात जीवनावश्‍यक वस्तू सोडून सर्व व्यवहार बंद असताना अवैध दारूविक्री चालू असल्याबाबतही आश्‍चर्य व्यक्त होत आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Legislative Council election : पुणे विधानपरिषद निवडणुकीत मोठी घडामोड; सुनील टिंगरे यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे

Monsoon Update News : आनंदवार्ता ! मॉन्सूनची केरळनंतर कर्नाटकात हजेरी, महाराष्ट्रात 'या' दिवशी दाखल होणार; हवामान विभागाचा नवा अंदाज समोर

कमळीच्या आनंदावर पडणार विरजण! आजोबांच्या मृत्यूचं सत्य अखेर समोर; प्रोमो पाहून प्रेक्षकही दुःखी

Pune Lonavala Railway: 'पुणे-लोणावळा रेल्वेमार्ग फुल्ल!' ८८% क्षमतेने धावणाऱ्या मार्गावर नव्या लोकल फेऱ्यांना ब्रेक, रेल्वे प्रशासनासमोर मोठे आव्हान

Latest Marathi News Live Update : नांदेड जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाचे आगमन

SCROLL FOR NEXT