शेतीच्या वादातून भावांमध्ये कोयत्याने हाणामारी Sakal
सोलापूर

Solapur Crime News : शेतीच्या वादातून भावांमध्ये कोयत्याने हाणामारी; परस्पर विरोधातील फिर्यादीवरून पाचजणांवर गुन्हा

जमिनीच्या बटईच्या पिकातील वाटणी न दिल्याने भाऊ वसंत चव्हाण व विकास चव्हाण या दोघांनी तलवार व कोयत्याने वार केले. वडील रामचंद्र चव्हाण याने आईला काठीने मारहाण केली

सकाळ वृत्तसेवा

Solapur News : जमिनीच्या बटईच्या पिकातील वाटणी न दिल्याने भाऊ वसंत चव्हाण व विकास चव्हाण या दोघांनी तलवार व कोयत्याने वार केले. वडील रामचंद्र चव्हाण याने आईला काठीने मारहाण केली, अशी फिर्याद सचिन रामचंद्र चव्हाण यांनी फौजदार चावडी पोलिसांत दिली.

तर जनावरे चारायला गेल्यावर शिवाजी चव्हाण व सचिन चव्हाण या दोन्ही भावांनी विकास व माझ्यावर तलवार व कोयत्याने वार केल्याची फिर्याद वडील रामचंद्र चव्हाण यांनी पोलिसांत दिली. या प्रकरणात परस्परविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

बाळे येथील श्रीकृष्ण मंदिराशेजारी रामचंद्र चव्हाण यांचे कुटुंब राहण्यास आहे. मंगळवारी (ता. १२) सायंकाळी सहाच्या सुमारास आई, भाऊ शिवाजी हे घरी बसले असताना वडील रामचंद्र व भाऊ वसंत आणि विकास त्याठिकाणी आले.

त्यांनी शेतजमिनीच्या बटईच्या पिकांमधील वाटणीचा विषय काढला. वाटणी न दिल्याने भाऊ वसंत याने डोके व हातावर तलवारीने वार केले. त्यानंतर भाऊ शिवाजी हा भांडण सोडविण्यासाठी आल्यावर विकासने कोयत्याने त्याच्या हातावर वार केले आणि आई शांताबाईला वडिलांनी काठीने मारून जखमी केले, अशी फिर्याद सचिन रामचंद्र चव्हाण यांनी पोलिसांत दिली.

त्यानुसार तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर पहिल्या गुन्ह्यातील संशयित आरोपी रामचंद्र चव्हाण (वडील) यांच्या फिर्यादीवरून मुलगा विकास शेतात जनावरांना चारा घालण्यासाठी गेल्यावर त्याला शेतात येवू न देता शिवाजी व सचिन या दोन्ही मुलांनी विकासवर तलवार व कोयत्याने वार केले.

माझ्या डाव्या मनगटाजवळ व पायाच्या टाचेजवळ मार लागून जखमी झाल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. त्यावरून शिवाजी व सचिन चव्हाण या दोघांविरूद्ध देखील गुन्हा दाखल झाला आहे.

किरकोळ वादातून कोयता अन्‌ तलवारीने वार

शेती व शेतातील पिकांच्या वाटणीवरून बालपणी एकमेकांशिवाय न राहणारे, एकमेकांच्या अंगाखांद्यावर खेळलेले भाऊ आता परस्परांचा जीव घ्यायला निघाले हे विशेष. वयस्कर आई-वडिलांनाही त्यांनी सोडले नाही, असे फिर्यादीवरून स्पष्ट होते. सर्वच संशयित आरोपी जखमी असल्याने बुधवारी संशयितांना अटक करण्यात आलेली नव्हती. सहायक पोलिस निरीक्षक बारवकर तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्सची विजयी मालिका खंडित! सनरायझर्स हैदराबादचा शानदार विजय; IPL 2026 Points Table बदललं

IPL 2026: आश्चर्यच... ना विराट, ना शुभमन Orange Cap तिसऱ्याच कुणाकडे; Purple Capवर चेन्नईच्या गोलंदाजाने निर्विवाद वर्चस्व

'काँग्रेस, काँग्रेस आणि फक्त काँग्रेस...;' मोदींचा केंद्रबिंदू त्याच नावाभोवती फिरला, संपूर्ण भाषणात किती वेळा उल्लेख केला?

SRH vs CSK Live: ४,४,४,४,४,६! आयुष म्हात्रेचं वादळ हेनरिच क्लासनने रोखलं; अविश्वसनीय झेल घेत हैदराबादचं मैदान गाजवलं Video Viral

होर्मुझ संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक! समुद्री व्यापारासाठी ‘सुरक्षाकवच देणार; जहाजांसाठी मोठी खुशखबर

SCROLL FOR NEXT