chandrabhaga  sakal
सोलापूर

Pandharpur : चंद्रभागा नदी शुद्धीकरणाचे काम ‘नमामि चंद्रभागा’तून हाती घेण्यात आले असून तिसऱ्या टप्प्याला मंजुरी मिळण्याची अपेक्षा

विठ्ठल दर्शनासाठी येणारे लाखो भाविक पहिल्यांदा चंद्रभागेचे पवित्र स्नान करून तिचे तीर्थ तोंडात घेतात आणि मग विठुरायाच्या दर्शनाला जातात.

सकाळ वृत्तसेवा

‘नमामि गंगा’च्या धर्तीवर लाखो विठ्ठल भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या चंद्रभागा नदी शुद्धीकरणाचे काम ‘नमामि चंद्रभागा’तून हाती घेण्यात आले. अनेक वर्षांपासून सांडपाणी आणि अस्वच्छ पाणी मिसळल्याने चंद्रभागा (भीमा) नदी प्रदूषित झाली. यासाठी चंद्रभागा नदीकाठावरील १२० गावांमध्ये ‘स्वच्छ भारत मिशन’मधून शोष खड्डे, सांडपाणी व्यवस्थापन आणि घनकचरा व्यवस्थापन ही कामे होणार आहेत. पहिल्या दोन टप्प्यातील कामे अपूर्णच असून आता तिसऱ्या टप्प्याच्या प्रस्तावाला मंजुरी न मिळाल्याने ‘नमामि चंद्रभागा’ अभियान ठप्प असल्याची वस्तुस्थिती आहे.

विठ्ठल दर्शनासाठी येणारे लाखो भाविक पहिल्यांदा चंद्रभागेचे पवित्र स्नान करून तिचे तीर्थ तोंडात घेतात आणि मग विठुरायाच्या दर्शनाला जातात. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून चंद्रभागेची अत्यंत वाईट अवस्था झाल्याने वारकऱ्याच्या मोठी नाराजी होती. त्यांना अस्वच्छ पाण्यात स्नान करावे लागते आणि तेच पाणी तोंडात घ्यावे लागते.

प्रशासनाने ‘नमामि चंद्रभागा’तून शुद्धीकरणाचे काम पुन्हा हाती घेतल्याने लाखो वारकऱ्यांना चंद्रभागेच्या शुद्ध पवित्र पाण्यात स्नान करण्याचा आनंद घेता येणार आहे. चंद्रभागा अर्थात भीमा नदीच्या काठावर साधारणतः १२० गावे आहेत, ज्याचे सांडपाणी नदीत मिसळते. या नदी काठावरील गावातील सांडपाणी नदीत मिसळू नये, त्या गावांमध्ये शोष खड्डे, सांडपाणी व्यवस्थापन ही कामे होणार आहेत. मात्र, पहिल्या दोन टप्प्यात मंजुरी मिळालेली कामे अजूनही १०० टक्के पूर्ण झालेली नाहीत हे विशेष.

तिसऱ्या टप्प्याला मंजुरी मिळण्याची अपेक्षा

‘नमामि चंद्रभागा’साठी स्वच्छ भारत मिशन व नमामि चंद्रभागा अभियानाअंतर्गत निधी अपेक्षित आहे. ‘नमामि चंद्रभागा’साठी विभागीय आयुक्त स्तरावर स्वतंत्र समिती आहे. त्यांच्याकडून तिसऱ्या टप्प्याला तातडीने मान्यता मिळावी अशी अधिकाऱ्यांना अपेक्षा आहे.

त्यांचा विभागीय आयुक्तपदाचा कार्यकाळ काही महिनेच राहिला आहे. त्याठिकाणी नवीन अधिकारी आल्यानंतर पुन्हा त्यांना अभियानाचा अभ्यास करून मंजुरी देण्यास विलंब होवू शकतो, अशी चर्चा अधिकाऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे विभागीय आयुक्त श्री. राव आता तिसऱ्या टप्प्याला कधीपर्यंत मंजुरी देतात आणि चंद्रभागा पूर्णत: स्वच्छ कधीपर्यंत होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Protest : सरकारकडून चर्चेची तयारी, तर दुसरीकडे मेट्रोची १५ स्टेशन्स बंद; राजधानीत काय घडतंय?

Sadabhau Khot Education : 'नीट विरोधात आंदोलन करणारे विद्यार्थी आतंकवादी'; असे म्हणणाऱ्या सदाभाऊ खोतांचे शिक्षण झाले तर किती?

Live Updates Marathi : पाटणात कॉंग्रेस कार्यालयाबाहेर भाजपचे आंदोलन, कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचा आरोप

४८ तास धोक्याचे! राज्यात पावसाचा जोर कायम राहणार; घाटमाथ्यावर 'रेड अलर्ट', मुंबईसह अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशी IN, रिंकू सिंगचे पुनरागमन, एकाचे पदार्पण! पहिल्या सामन्यासाठी टीम इंडियाची Playing XI

SCROLL FOR NEXT