Chhavani. 
सोलापूर

शेटफळला आले छावणीचे स्वरूप ! चोरगेवस्ती परिसर बिबट्या शोध मोहिमेच्या केंद्रस्थानी 

गजेंद्र पोळ

चिखलठाण (सोलापूर) : करमाळा तालुक्‍यात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याचे वास्तव्य अजूनही शेटफळ गावाच्या शिवारातच असल्याचा वनविभागाचा अंदाज असल्याने, बिबट्याच्या शोध मोहिमेतील केंद्रस्थानी असलेल्या शेटफळ गावात वन विभागाबरोबरच पोलिस, राज्य राखीव दल, त्यांची वाहने, पिंजरे, इतर लवाजमा यांच्या वावराने छावणीचे स्वरूप आले आहे. रात्रंदिन मेहनत घेऊन या मोहिमेत सहभागी कर्मचाऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था या गावातील तरुण करत आहेत. 

चिखलठाण येथे ऊसतोड मजुराच्या मुलीवरील हल्ल्यानंतर वनविभागाच्या तावडीतून निसटलेल्या बिबट्याने अद्यापपर्यंत कोणत्याही व्यक्तीवर हल्ला केलेला नाही. परंतु, यानंतर तालुक्‍यातील अनेक ठिकाणांवरून "आम्हाला बिबट्या दिसला' अशी माहिती वन विभागाकडे येते आहे. त्यानंतर वनविभागाचे कर्मचारी तिथे जाऊन खात्री करतात. परंतु, अद्यापपर्यंत त्याचे खात्रीलायक ठिकाण वनविभागाला आढळलेले नाही. मात्र, शेटफळ गावाच्या दक्षिणेला एक ते दीड किलोमीटर अंतरावर चोरगेवस्ती परिसरात आढळलेले पावलांचे ठसे यानंतर या परिसरात उच्च क्षमतेचे कॅमेरे लावून लक्ष ठेवले जात आहे. याच परिसरात बिबट्या असावा, असा वनविभागाचा कयास आहे. यामुळे शेटफळ गाव या मोहिमेच्या केंद्रस्थानी आहे. 

या गावाला वनविभागाचे विविध जिल्ह्यांतील अधिकारी, कर्मचारी, पिंजरे लावणारे मजूर, वाघर लावणारे लोक, श्वानपथक, शार्पशूटर, ड्रोन कॅमेरामन, सोलापूर ग्रामीण पोलिस, राज्य राखीव दल, मीडिया प्रतिनिधी व या क्षेत्राची आवड असणारी मंडळी आपल्या विविध वाहनांसह या ठिकाणी वावरत आहेत. त्यामुळे गावाला छावणीचे स्वरूप आले असून, हे गाव मुख्य शहरापासून दूर असल्याने व या ठिकाणी हॉटेल व्यवस्था नसल्याने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून या लोकांच्या जेवणाची सोय या गावातील तरुण करत आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on NEET Case : शरद पवार नीट प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले, नीट पेपर प्रकरणात दोन महिन्यांत सकारात्मक परिणाम दिसतील

Chandrashekhar Bawankule: जमीन हस्तांतर, पुनर्विकासाचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना; महसूलमंत्री बावनकुळे यांचा निर्णय

IND vs AFG: जैस्वाल स्वस्तात बाद, तर केएल राहुलला मिळालं जीवनदान; पहिल्या सत्रात काय घडलं?

Whatsapp Update : सीन करताच गायब होणार मेसेज! व्हॉट्सॲपमध्ये होतेय View Once Message फीचरची एन्ट्री; पाहा कसं वापरायचं?

Latest Marathi News Update: कांद्याच्या खरेदीसाठी प्रशासनाची पुढाकार बैठक, शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या

SCROLL FOR NEXT