Colleges in Solapur district should report internal marks by the end of June 
सोलापूर

सोलापूर जिल्ह्यातील महाविद्यालयांनी जूनअखेर कळवावेत अंतर्गत गुण 

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या निर्देशानुसार प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांना अंतर्गत ऍसेसमेंटवरून 50 टक्के तर मागील सत्रातील गुणांच्या सरासरीवरून 50 टक्के गुण दिले जाणार आहेत. त्यानुसार सर्व महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण 30 जूनपर्यंत विद्यापीठाला कळवावेत, असे निर्देश पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने बुधवारी (ता. 20) व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीत महाविद्यालयाच्या प्राचार्यांना दिले. 

विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयांमध्ये प्रथम व द्वितीय वर्षात प्रवेश घेतलेल्या ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षेचा अर्ज केलेला नाही, त्यांच्यासाठी 25 जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तर प्रथम व द्वितीय वर्षातील सर्व विद्यार्थ्यांना पुढील सत्रात (वर्षात) प्रवेश दिला जाणार आहे. मात्र, बॅकलॉग विद्यार्थ्यांनी ते विषय पुढील 120 दिवसांत उत्तीर्ण होणे आवश्‍यक आहे, असेही विद्यापीठाने या बैठकीत स्पष्ट केले. दरम्यान, प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांना उर्वरित 20 गुणांचे अंतर्गत ऍसेसमेंट व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे अथवा त्यांच्या मोबाईलद्वारे पूर्ण करून घेण्याच्या सूचनाही विद्यापीठाने यावेळी दिल्या. 

...तर अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षा 
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार 31 जुलैपर्यंत अंतिम वर्षातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा सुरक्षिततेच्या कारणावरून रद्द करावी आणि या विद्यार्थ्यांना ग्रेड हा पर्याय देण्यास मान्यता द्यावी, असे पत्र विद्यापीठ अनुदान आयोगाला पाठवले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा घेण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही. मात्र, अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचे निश्‍चित झाल्यास पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठांतर्गत असलेल्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना घरपोच प्रश्‍नपत्रिका देऊन त्यांच्याकडून ती सोडवून घेण्याची तयारी महाविद्यालयांनी दर्शवली आहे. त्यानुसार विद्यापीठ नियोजन करेल, असेही परीक्षा नियंत्रक श्रेणीक शहा यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidyanand Bapat : गणेशोत्सवावरील वक्तव्य भोवले? विद्यानंद बापटांना ४८ तासांत माफी मागण्याची नोटीस

Maharashtra Sugarcane: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ऊस गाळपाचा मुहूर्त ठरला; १५ ऑक्टोबरपासून २०२६-२७ चा ऊस गाळप हंगाम सुरू होणार

Ammy Virk Attacked : कॉन्सर्ट संपवून घरी परतताना प्रसिद्ध गायक एमी विर्कच्या वाहनावर धडाधड गोळ्या झाडल्या; रोल्स रॉयसची केली चाळण

Amravati Hospital Fire: व्हेंटिलेटरच्या देखभालीअभावी तीन अर्भकांचा मृत्यू; अमरावती रुग्णालयातील पाच जण निलंबित

Pune Metro: पुणे मेट्रो लाइन ३ च्या उद्घाटनाचा मार्ग मोकळा; माण ते बालेवाडी पहिला टप्पा पूर्ण, पीएमओला अहवाल, कधी हाेणार सुरु?

SCROLL FOR NEXT