P. Shivshankar. 
सोलापूर

दुकाने सातही दिवस राहणार सुरू ! आयुक्त पी. शिवशंकर यांची माहिती

वेणुगोपाळ गाडी

सोलापूर : शहरातील सर्व दुकाने (अत्यावश्‍यक सेवा वगळता) शुक्रवारपासून (ता. 2) सातही दिवस सकाळी सात ते सायंकाळी आठपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी गुरुवारी (ता. 1) पत्रकार परिषदेत दिली. 

आयुक्तांनी सांगितले की, याआधीच्या आदेशानुसार शहरातील दुकाने सोमवार ते शुक्रवारपर्यंत सकाळी सात ते सायंकाळी सातपर्यंत ठेवण्यास मुभा देण्यात आली होती. हॉटेल, बार, रेस्टॉरंटची वेळ सायंकाळी आठपर्यंत होती. शनिवारी व रविवारी सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. या पार्श्‍वभूमीवर शासनाच्या सुधारित आदेशानुसार दोन एप्रिलपासून महापालिकेने शहरात नवीन नियमावली लागू केली आहे. 

याअंतर्गत आता सातही दिवस सर्व दुकाने (मेडिकल, दवाखाने आदी अत्यावश्‍यक सेवा वगळता) सकाळी 7 ते सायंकाळी 8 पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात येत आहे. हॉटेल, खाद्यगृहे, पार्क, चौपाटी, परमीट रूम व बार सकाळी सात ते रात्री आठपर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवावी. जेवणाची होम डिलिव्हरीची सेवा देण्याची वेळ ही रात्री 10 वाजेपर्यंत राहील, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI News: WhatsApp वर RBI चा मेसेज आला? खिशातील रुपया आता मोबाईलमध्ये! डिजिटल रुपया म्हणजे काय आणि तो कसा वापरायचा जाणून घ्या

Team India : सूर्यकुमार यादवसाठी दरवाजे अजूनही खुले... माजी कर्णधाराचे टीम इंडियात पुनरागमन शक्य... जाणून घ्या, कसं!

Latest Marathi News Live Update : कॅलिफोर्नियातील जॉर्डन ब्राउन या अमेरिकन नागरिकाला अटक केली

IND vs ENG: 'Lords' वर देव! भारतीय महिला खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी पोहोचला सचिन तेंडुलकर Video

Devkund News: देवकुंड डोहात बुडालेल्या दोन्ही तरुणांचे मृतदेह 50 फूट खोल डोहात सापडले; अवघ्या पंधरा मिनिटात रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी

SCROLL FOR NEXT