subhash deshmukh solapur 
सोलापूर

सरसकट शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची आमदार सुभाष देशमुख यांची मागणी 

सकाळवृत्तसेवा

दक्षिण सोलापूर ः गेल्या आठवड्यात दक्षिण सोलापूर तालुक्‍यासह जिल्ह्यात अतिवृष्टीने हाहाकार उडाल्याने शेतकरी पुरता मेटाकुटीस आला आहे. या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे. आता शासनाने पंचनामे करण्यात वेळ न घालवता सरसकट नुकसान भरपाई द्यावी अन्यथा रस्त्यावर उतरु, असा सज्जड इशारा आमदार सुभाष देशमुख यांनी दिला. 

आमदार देशमुख यांनी मंगळवारी दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील अकोले (मं), मनगोळी, वांगी, वडकबाळ, होनमुर्गी, राजूर, औराद, बोळकवठा, हत्तरसंग, कुडल आदी गावात जाऊन पूरग्रस्त तसेच अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्यक्ष भेटून विचारपूस केली. या शेतकऱ्यांना शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळवून देणार असल्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. यावेळी मंद्रूपच्या अप्पर तहसीलदार उज्ज्वला सोरटे, भाजपा सरचिटणीस यतीन शहा, हणमंत कुलकर्णी, गौरीशंकर मेंडगुदले, विजय पाटील, समाधान घंटे, लक्ष्मण पाटील, शामराव हांडे, अप्पासाहेब पाटील, सुरेश पुजारी, गुरण्णा तेली, चिदानंद बगले, संदीप टेळे, बनसिध्द वडरे, संगप्पा केरके यांच्यासह मंडल अधिकारी, कृषी अधिकारी, तालुका विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी उपस्थित होते. 

आमदार देशमुख पुढे म्हणाले की, सीना-भीमा या दोन्ही नद्या तालुक्‍यातून वाहतात. त्यामुळे येथील हजारो एकर पिकात पुराचे पाणी घुसले. तसेच शेकडो घरात पाणी शिरल्याने घरांचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता पंचनामे न करता शासनाने तातडीने मदत द्यावी. एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. लवकरात लवकर मदत न दिल्यास रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांसाठी संघर्ष करावा लागेल. यावेळी महापुरात अडकलेल्या नदाफ आणि जाधव कुटुंबातील सात लोकांना वाचवलेल्या मनगोळी गावातील परशुराम भोई, कमलाकर भोई, अनिल भोई, प्रकाश भोई, बालाजी भोई या तरुणांचे आमदार देशमुख यांनी कौतुक केले. 

संपादन : अरविंद मोटे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL Day 4: भारताचा श्रीलंकेवर कहर! 290 धावांत ऑलआऊट करत दिला फॉलोऑन; दिनुशाचं शतकही व्यर्थ

Palghar Attack Case: कोयत्याने वार केलेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू ; दोन महिन्याच्या उपचारानंतरही झुंज अपयशी

भावांची एक लाईन आणि ओवाळणाऱ्या बहिणींची दुसरी लाईन... झी मराठीच्या कलाकारांनी सांगितल्या रक्षाबंधनाच्या आठवणी

Latest Marathi News Live Update : मुंबईतील आमदारांचे रिपोर्ट कार्ड समोर; शिंदेंच्या आमदाराची कामगिरी सर्वांत खराब

CTET 2026 New Date : सीटीईटी परीक्षा देणाऱ्यांसाठी मोठी बातमी! 6 सप्टेंबरची परीक्षा पुढे ढकलली; नवी तारीख 'या' दिवशी होणार जाहीर

SCROLL FOR NEXT