Corona Impact on hair cutting shop 
सोलापूर

स्वप्नातही वाटलं नव्हतं, बायको म्हणते तुमची कटिंग करू का! 

अशोक मुरूमकर

सोलापूर : सकाळी बायकोचा फोन आला. तेव्हा तिने बोलायला सुरवातच प्रश्‍नाने केली. पहिला तिचा प्रश्‍न होता "तुम्ही कटिंग केली का?' म्हटलं "नाही.' पुढे ती म्हणाली, "गावाकडं बघा, त्या शिवाने (शिवाजी नाव आहे) तर घरीच साहित्य आणलंय कटिंग करायचे. सगळ्याच लेकरांची चंटी (टक्कल) केली आहे. अशीच अनेकांनी सध्या चंटी केली आहे. तुमच्याकडेही साहित्य आहे ना? मी करते तुमची कटिंग.' 
हा विनोदाचा भाग नाही. कोरोनाच्या फटक्‍यामुळे सध्या अनेकांची डोकी वाढली आहेत (डोक्‍यावरचे केस वाढले आहेत.). त्यामुळे तोंड लहान झालेत आहेत आणि डोकं मोठं दिसत आहे. अनेकांना कटिंग करायची आहे, पण कटिंगची दुकानंच बंद आहेत. त्यामुळे कटिंग कुठे करायची, हा प्रश्‍न आहे. 
गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने सध्या जगभर थैमान घातले आहे. भारतातही त्याचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे सध्या लॉकडाऊन केला आहे. त्याचा परिणाम केशकर्तनालयांना बसला आहे. त्यामुळे कटिंगही करणे अवघड झाले आहे. त्यातच सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात एक महिला पुरुषाची कटिंग करताना दिसत आहे. हा विनोदाचा भाग असला, तरी मी हा व्हिडिओ एका मैत्रिणीला पाठवला, तर ती म्हटली "प्रेमा मॅमकडून तुम्हीही कटिंग करून घ्या.' तोच व्हिडिओ मी माझ्या बायकोलाही पाठवला होता. त्यावर ती म्हणाली, "तुम्ही या गावाकडे, मी कटिंग करते.' हा दोन दिवसांखालील प्रकार होता. खरं सांगायचं तर डोकं सध्या एवढं वाढलं आहे, त्यामुळे "सध्या माझ्या काही कामातही काय बदल केला आहे,' असं अनेकांनी मला सांगितलंय. सकाळी एक सहकारी सांगत होता, "माझं तर एवढं डोकं वाढलंय, अक्षरश: बायकोने रात्री कटिंग केली.' हा व्हिडिओ खरा आहे, की खोटा माहीत नाही; पण माझ्या बाबतीत हा प्रकार खरा झाला आहे. परवा मैत्रिणीशी बोलताना सहजच कटिंग वाढल्याचा विषय निघाला, तेव्हा तीही कुतूहलाने म्हणाली, "खरंच सध्या सगळ्यांची अशीच परिस्थिती झाली आहे.' त्याच दिवशी माझा मुलगा, वडील आणि भावाचा मुलगा दोन किलोमीटरवर कटिंग करण्यासाठी खेड्यातील एका गावात चालत गेले होते, असं समजलं. यातील विनोदाचा अन्‌ काय स्वत: रंगवलेला भाग सोडा, पण सध्या कोरोनामुळे असं जगण्याचे वास्तव चित्र निर्माण झाले आहे. 
खेड्यात सुद्धा नागरिकांच्या मनात प्रचंड भीती निर्माण झाली असून, प्रत्येकजण स्वत:च स्वत:ला लॉकडाऊन करत आहे. अत्यावश्‍यक वस्तूंची दुकानं सोडली तर इतर सर्व दुकानं बंद आहेत. त्याचा फटका सर्वांनाच बसत आहे. यातून दुकानदारांचे आर्थिक नुकसान तर होतच आहे, शिवाय हे नुकसान आम्ही सहन करायला तयार आहोत. आम्हालाही आयुष्य आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत दुकान उघडणार नाही, असं केशकर्तनालय चालक सांगत आहेत. कोरोनाच्या भितीने सतत कटींग नको म्हणून ग्रामीण भागात तर अनेकांनी घरीच चंटी केली आहे. महाराष्ट्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत १९ हजारांहून अधिक जन्म प्रमाणपत्रांमध्ये केलेले बदल रद्द होणार; सरकारचा मोठा निर्णय, कारण काय?

भारतीय संघात खळबळ! आम्हाला काय ते स्पष्ट सांगा... 'सीनियर्स' थेट BCCI कडे पोहोचले, गौतम गंभीरला खिजगणतीतही नाही धरले...

आरएसएस मुख्यालय, स्मृती भवन उडवून देऊ! धमकीच्या मेलनंतर नागपूर पोलीस अ‍ॅक्शन मोडवर, दोन तास केली तपासणी

Latest Marathi News Live Update : प्रशासनाच्या आश्वासनानंतर थकीत ऊस बिलासाठीचे जलसमाधी आंदोलन स्थगित

Mumbai: रेल्वेला नवी लाइफलाइन! पनवेल-कर्जत कॉरिडॉरचे ९८ टक्के काम पूर्ण, आधुनिक स्थानके सज्ज

SCROLL FOR NEXT