Corona Impact on Trains Coming to Solapur 
सोलापूर

पुणे, मुंबईकडून येणाऱ्या रेल्वेत का राहत आहेत रिकामे सीट?

अशोक मुरूमकर

सोलापूर : पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने धावणाऱ्या रेल्वे गाड्यांवर कोरोना व्हायरसचा परिणाम झाल्याचे चित्र आहे. दररोज पुण्यातून येणाऱ्या मुंबई- पुणे- सोलापूर इंद्रायणी एक्स्प्रेसमध्ये शुक्रवारी अनेक सीट रिकामी होते. गाडीतही अनेक प्रवाशांनी तोंडाला मास्क व काही प्रवाशांनी रुमाल बांधल्याचे चित्र होते. 
जगभरात धुमाकुळ घातलेल्या कोरोना व्हायरसने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण केले आहे. ग्रामीण भागात याबाबत चिंता व्यक्त केली जात असून रेल्वेचा प्रवास टाळण्यास सुरुवात केली आहे. मुंबई- पुण्यातून सोलापूरला येणाऱ्या रेल्वे प्रवाशांची नेहमी संख्या मोठ्या प्रमाणात असते. मात्र, पुण्यात कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळल्यापासून आपल्याजवळ कोरोना आल्याचे नागरिक सांगत असून सतर्कता म्हणून पुण्यातून येणाऱ्या गाड्यांचा प्रवास टाळू लागले आहेत. इंद्रायणी एक्स्प्रेस पुण्यातून ९.३० वाजता सोलापूरकडे निघते. दुपारी दीडच्यादरम्यानही गाडी सोलापुरात येते. या गाडीला जेऊर आणि कुर्डुवाडी येथे थांबा आहे. जेऊर येथून सोलापूरला येणाऱ्यांची संख्या मोठी असते. मात्र सध्या ती कमी झाली आहे. अनेकजण एसटीने येऊ लागले आहेत. या गाडीत नेहमी मध्ये प्रवाशी उभा राहिल्याने चालणे सुद्धा अवघड होते. मात्र आता अनेक सिट रिकामे राहत आहेत. गाडी वेळेवर येत असल्यानेही यावर परिणाम झाला असल्याचे काही प्रवाशांनी सांगितीले तर कोरोनाचा मोठा परिणाम झाला असल्याचे अनेकांनी सांगितले.

पीएमटीतही तोच विषय...
श्रीकांत नलवडे म्हणाले, पुण्यात नागरिकांमध्ये कोरोनामुळे भितीचे वातावरण आहे. सोलापूरहुन काही कामानिमित्त पुण्यात एका दिवसाच्या कामासाठी गेलो होतो. पण, कोरोमुळे नागरिक बोलणे सुद्धा टाळु लागले आहेत. गर्दी करत नाहीत. पीएमटीने प्रवास करताना सुद्धा फक्त कोरोनाचाच विषय ऐकायला मिळाल्याचे त्यांनी सांगितले. नलवडे हे सोलापूरत एका बँकेत नोकरीला आहेत. कामासाठी ते पुण्यात इंद्रायणीनेच गेले होते. तेव्हा सुद्धा गर्दी नसल्याचे त्यांनी सांगितले. 

रेल्वे प्रवाशांमध्ये भिती
प्रशांत शिंदे म्हणाले,  कोरोनाने घाबरण्याचे कारण नाही. मात्र, नागरिकांनी काळजी घेणे आवश्‍यक आहे. काळजी घेतली तर त्यापासून भिती नाही. याचाच परिणाम सध्य रेल्वे प्रवाशांवर झाला आहे. इतर गाड्यांमध्ये सुद्धा असाच परिणाम असल्याचे सांगत रेल्वे स्टेशनवर तसं जाणवत असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED Action against Anil Ambani : अनिल अंबानींवर ‘ED’ची मोठी कारवाई!, मुंबईतील अलीशान घर तात्पुरते जप्त

PCMC News : ‘स्थायी’च्या अध्यक्षपदासाठी अभिषेक बारणेंना संधी; एकमेव अर्ज दाखल; बिनविरोध निवड निश्चित, शनिवारी होणार शिक्कामोर्तब

Lung cancer in Mumbai : मुंबईत फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या ५७ टक्के रुग्णांमध्ये प्रदूषण हेच प्रमुख कारण!

SL vs NZ, T20 WC: न्यूझीलंडची उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल! श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात, जाता जाता पाकिस्तानची लावली वाट

Bride shot at wedding ceremony Video : विवाहमंडपात थरार! नववधूवर माथेफिरू प्रियकरानं सर्वांसमोरच झाडली गोळी

SCROLL FOR NEXT