ceo dilip swami 
सोलापूर

झेडपीत येणाऱ्या शिक्षकांना लगाम, पूर्वपरवानगीशिवाय आल्यास शिक्षकासह मुख्याध्यापक, केंद्रप्रमुखावर कारवाई 

प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेतील प्रशासनात गतिमानता आणि पारदर्शकता आणण्यासाठी महत्त्वाचे निर्णय आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी घेतले आहेत. जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात विनाकारण चकरा मारणाऱ्या शिक्षकांवर आता कारवाई केली जाणार आहे. पूर्वपरवानगीशिवाय शिक्षक जर जिल्हा परिषद मुख्यालयात आले तर त्या शिक्षकासह ते ज्या शाळेत आहे त्या शाळेतील मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख यांच्यावरही प्रशासकीय कारवाई करणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. 

जिल्हा परिषदेत अनेक शिक्षक आपल्या कामासाठी येतात. वैद्यकीय देयके आणि भविष्य निर्वाह निधीची प्रकरणे या दोन कामांसाठीच बहुतांश शिक्षक जिल्हा येतात. या फाईल मार्गी लावण्यासाठी महत्त्वाच्या "गाठीभेटी' घेण्यासाठी अनेक शिक्षक जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात वारंवार चकरा मारत असल्याचे सीईओ स्वामी यांच्या निदर्शनास आले आहे. बऱ्याच वेळा या फाईल कोणत्या टप्प्यावर आहेत? हे शिक्षकांना कळत नसल्याने ते वारंवार जिल्हा परिषदेत चकरा मारतात, अनावश्‍यक गर्दी करतात.

शिक्षकांचाही प्रश्‍न सुटावा आणि जिल्हा परिषदेत अनावश्‍यक चकरा मारणाऱ्या शिक्षकांवर चाप बसावा यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी पर्यायी उपाय योजना केली आहे. जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर दर सोमवारी कार्यालयात प्राप्त फाईलची स्थिती प्रसिध्द केली जाणार आहे. शिक्षकांनी दिलेली फाईल सध्या कोणत्या विभागात आहे, हे आता वाडी वस्तीवर काम करणाऱ्या शिक्षकांना देखील वेबसाईटच्या माध्यमातून समजणार आहे. त्यामुळे आपल्या कामासाठी कोणाला भेटण्याची शिक्षकांना आवश्‍यकता नाही. त्यातून प्रशासनात पारदर्शकता येईल असा विश्वासही सीईओ स्वामी यांनी व्यक्त केला आहे. 
 
प्रयोग करणारी पहिली झेडपी 
सध्या शिक्षकांसाठी केला जाणारा हा प्रयोग भविष्यात जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांसाठी लागू केला जाणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. फक्त गतिमानता नव्हे तर पारदर्शकता देखील या निर्णयामुळे येणार आहे. शिक्षक कर्मचारी त्यांच्या मुख्यालयात थांबले तर विद्यार्थ्यांना शिक्षकांचा अधिक वेळ मिळेल अपेक्षाही सीईओ स्वामी यांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT