crime_scene 
सोलापूर

Breaking ! अक्कलकोट तालुक्‍यातील हालहळी येथे सोलापूरच्या युवकाचा जाळून निर्घृण खून

चेतन जाधव

अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट तालुक्‍यातील हालहळी अ. या गावात एका बावीस वर्षीय युवकाचा अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून जाळून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. अज्ञात आरोपीविरुद्ध उत्तर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, की या घटनेची फिर्याद सिद्राम ईराप्पा सावगे (वय 55, रा. विजयपूर नाका, एक नंबर झोपडपट्टी, सोलापूर, तालुका उत्तर सोलापूर) यांनी उत्तर पोलिस ठाण्यात दिली. 

खून झालेल्या व्यक्तीचे नाव सागर सिद्राम सावगे (वय 22, रा. विजयपूर नाका, एक नंबर झोपडपट्टी, सोलापूर, तालुका उत्तर सोलापूर) असे आहे. सागर सिद्राम सावगे या युवकाचा अज्ञात कारणावरून अज्ञात व्यक्तीने जाळून जीवे ठार मारले. हा खून 24 जानेवारी दुपारी एक ते 25 जानेवारी दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान अक्कलकोट तालुक्‍यातील हालहळी अ. येथे झाल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. 

घटनास्थळाला उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष गायकवाड यांनी भेट देऊन पाहणी केली. अज्ञात आरोपीविरुद्ध उत्तर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, याचा अधिक तपास पोलिस निरीक्षक कल्लप्पा पुजारी हे करीत आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT