18683780_RxU2aUhrUZufOUzFHIueFJGHxiX2gol63uy2gNs1YmQ - Copy.jpg 
सोलापूर

महापालिकेतील निलंबितांचा ठरला निर्णय! सात कर्मचाऱ्यांवर 'अशी' होणार कार्यवाही 

तात्या लांडगे

सोलापूर : महापालिकेचे तत्कालीन विधान सल्लागार अरुण सोनटक्‍के, लिपीक देशमुख यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. या दोघांबाबतचा निर्णय शासनाने घ्यावा, असा प्रस्ताव शासन दरबारी पाठविण्यात आला आहे. उर्वरित पाच कर्मचाऱ्यांचा निर्णय विभागीय चौकशीनंतर घेतला जाणार आहे.

महापालिकेतील तत्कालीन विधान सल्लगार, गलिच्छ वस्ती सुधार योजनेअंतर्गत कर वसुलीसाठी नियुक्‍त एक लिपीक, वसुलीसाठी नियुक्‍ती तीन लिपीक, कोरोना ड्यूटी नाकारणारा एक कर्मचारी आणि झोन आठमधील ज्यु. इंजिनिअर यांच्यावरील निलंबनाच्या कारवाईनंतर पुढे काय, याबाबत आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी बुधवारी (ता. 26) बैठक घेतली. या बैठकीसाठी उपायुक्‍त अजयसिंह पवार, पंकज जावळे आदी उपस्थित होते. या बैठकीत सोनटक्‍के आणि देशमुख यांचे प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याचा निर्णय झाला. तर ज्यु. इंजिनिअर अविनाश कामत यांची विभागीय चौकशी करुन त्यांच्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे आयुक्‍तांनी स्पष्ट केले. महापालिका आयुक्‍तांनी कर वसुलीचे उद्दिष्टे देऊनही वसुली करण्यात कमी पडलेल्या तीन कर्मचाऱ्यांनाही निलंबित करण्यात आले होते. तर कोरोनाची ड्यूटी देऊनही आजारी असल्याचे बनावट कारण देत ड्यूटी नाकारणाऱ्या एका कर्मचाऱ्यालाही निलंबित केले होते. त्यानुसार आयुक्‍तांनी वसुलीचे उद्दिष्टे आणि त्यांनी केलेल्या वसुलीची माहिती घेऊन योग्य तो निर्णय घेण्याचे मान्य केले. तर कोरोना ड्यूटी नाकारणाऱ्याची कागदपत्रे मेडिकल कौन्सिलकडे पाठविण्याचा निर्णय घेतला.

निलंबनाची ठळक कारणे 

  • विधान सल्लागार सोनटक्‍के यांनी कायदेशीर सल्ला देण्यासाठी लाच म्हणून स्वीकारली होती मोठी रक्‍कम 
  • गलिच्छ वस्ती सुधार योजनेअंतर्गत कार्यरत लिपिक देशमुखने झोपडपट्टीच्या नोंदीसाठी स्वीकारली होती चौदाशे रुपयांची लाच 
  • झोन आठअंतर्गत नियुक्‍त अभियंता कामत यांनी केली होती मंडईच्या दुरुस्ती कामात हयगय 
  • तीन लिपिकांना कर वसुलीचे उद्दिष्टे देऊनही अपेक्षित वसुली न केल्याने त्यांना केले होते निलंबीत 
  • शहरात कोरोना वाढत असताना ड्यूटी देऊनही आजारी असल्याचे कारण देत कर्मचारी राहिला होता गैरहजर  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Siya Goyal: सियाने माध्यमांना खरंच मिडल फिंगर दाखवलं होतं का? पुरावा देत वडिलांनी दिलं स्पष्टीकरण; संपूर्ण घटनाच सांगितली!

मोठी बातमी! ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी, मेलबर्न पोलिसांकडून तपास

Pune Civic Negligence: मुंढव्यात निकृष्ट सांडपाणी कामामुळे रस्त्यात खोल खड्डा; ट्रक अडकला, महापालिकेवर नागरिकांची झोड

IND vs ENG, 2nd T20I: अभिषेक-ईशानची फिफ्टी हुकली, पण तिलक वर्माची दमदार फिनिशिंग, भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध १९० धावा पार

Pune Rain Alert: पुण्यात सलग पावसाची रिपरिप; घाट परिसरासाठी पुढील दोन दिवस ‘रेड’ अलर्ट, प्रशासनाचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

SCROLL FOR NEXT