swast dhanya.jpg 
सोलापूर

रेशन कार्ड असूनही ते स्वस्त धान्यापासून वंचित

सकाळ वृत्तसेवा


सोलापूरः शहरातील अनेक गरजू नागरिकांवर लॉकडाउनमध्ये धान्याची गरज असताना केवळ रेशनकार्डवर तहसीलचा शिक्का मारला नाही म्हणून धान्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. शासनाने रेशन सर्व गरजूंना धान्य द्यावे, अशी भूमिका घेतली असतानाही शिक्‍क्‍याच्याअभावी अनेकांना धान्य मिळेनासे झाले आहे. 

शहरात लॉकडाउन काळात सर्वाधिक मदतीचे काम पुरवठा खात्याच्या स्वस्त धान्य दुकानाकडून अपेक्षित होते. त्यासाठी शासनाने वेळोवेळी आदेश काढून तीन महिन्यांचे धान्य एकदम द्या, अशी सूचना केली. अनेक गरजू, रोजंदारी करणारे, छोटे व्यावसायिक यांना धान्याची आवश्‍यकता प्रमाणात होती. आर्थिक दुर्बल घटकात मोडणाऱ्या लाभार्थींना पिवळ्या शिधापत्रिका देणे आवश्‍यक असताना त्यांच्याकडे जादा आर्थिक उत्पन्न गटासाठी असणाऱ्या केशरी शिधापत्रिका आढळल्या. या दुर्बलांना पिवळ्या शिधापत्रिका मिळवण्याबाबत कोणतीच शासकीय प्रक्रिया केली नाही. त्यांना उत्पन्न नसताना यंत्रणेने केशरी शिधापत्रिका दिल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांना धान्य अपुरे मिळाले. 

अनेक केशरी शिधापत्रिकाधारकांना त्यांच्या शिधापत्रिकेवर शिक्का मारून आणा अशी सूचना करीत स्वस्त धान्य दुकानदारांनी माल देण्यास नकार दिला. लॉकडाउनमध्ये त्यांना शासकीय कार्यालयापर्यंत पोचणे अवघड असताना शिधापत्रिकेवर धान्याची मदत करण्याची गरज होती. धान्य न मिळाल्याने त्यांना नाईलाजाने सामाजिक कार्यकर्त्यांकडून होणाऱ्या अन्नदानाची मदत घ्यावी लागली. शिक्का मारण्याची अट संचारबंदीत चुकीची असताना देखील हा प्रकार घडला. 


वैदूवाडीत शिधापत्रिका कोऱ्या 
वैदूवाडी अंदाजे 200 लोकांची वस्ती आहे. या वस्तीत नागरिकांना शिधापत्रिका असतानादेखील संपूर्ण लॉकडाउनच्या काळात धान्य मिळाले नाही. शिक्का नसल्याच्या कारणावरून त्यांना धान्य मिळाले नाही. त्यांना शासकीय कार्यालयाची कोणतीही माहिती नसल्याने कोणाकडे जाऊन शिधापत्रिकेवर शिक्का मारायचा असा प्रश्‍न निर्माण झाला होता. अजूनही या नागरिकांना धान्याची प्रतीक्षा आहे. 

निदान धान्य हवे होते
मला कोणताच कामधंदा लॉकडाउनमुळे करता आला नाही. तेव्हा मला निदान धान्य मिळावे अशी अपेक्षा होती. पण शिधापत्रिकेवर शिक्का नसल्याने मला धान्य मिळाले नाहीच. 
- अलुबाई व्यंकट  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Missile Attack Crude Oil Tanker : इस्त्राईल-इराण युद्धात क्रूड ऑईल जहाजावर क्षेपणास्त्र हल्‍ला, कोल्हापूरचा रोहित पाटील जहाजात; अनेकांना बहरीनमध्ये हलवलं

IND vs NZ Final: ७ सामन्यांत १२.७१ ची सरासरी अन् ८९ धावा! अभिषेक शर्मा OUT, रिंकू सिंग IN? वर्ल्ड कप फायनलसाठी भारताच्या Playing XI मध्ये दोन बदल अपेक्षित

Sukhoi Fighter Jet Crash : 'Purvesh Is No More..'! कॅप्टनचे ते शब्द ऐकताच पूर्वेशच्या वडिलांवर मोठा आघात; म्हणाले, 'छत्रपती शिवरायांचा त्याच्यावर..'

आगीत घर गमावलेल्यांना मोठी मदत! आग घटनेत बेघर झालेल्यांना जमीन देण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय; पण नेमकं कुणाला आणि कुठे?

बायकोनं केलेला आरोप खरा ठरला? खरंच थलपती विजयचं अभिनेत्रीसोबत अफेअर? सोशल मीडियावर दोघांचा Viral Video

SCROLL FOR NEXT