Aawati dargah 
सोलापूर

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवाटी येथे गुरुवारी होणारा जश्‍न-ए-गौस-ए-आजमचा कार्यक्रम रद्द 

दस्तगीर मुजावर

पांडे (सोलापूर) : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आवाटी (ता. करमाळा) येथे 3 डिसेंबर दिवशी होणारा जश्‍न - ए - गौस - ए - आजम हा धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती आवाटी येथील हाजी सय्यद वली चॉंदपाशा कादरी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष हाजी कादरभाई तांबोळी व विश्वस्त गुलाम नबी कादरी यांनी पत्रकारांना दिली. 

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मार्च महिन्यापासून अनेक सण - उत्सव साधेपणाने व गर्दी न होता केले आत आहेत. मंदिरे व प्रार्थनास्थळे दर्शनासाठी खुली करण्यात आली असून, गर्दी टाळून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक कार्यक्रमांवर बंधने आली आहेत. त्याचप्रमाणे आवाटी (ता. करमाळा) येथील जश्‍न - ए - गौस - ए - आजम हा धार्मिक कार्यक्रमही या वर्षी रद्द करण्यात आला आहे. 

गुरुवारी (3 डिसेंबर) (उर्दू तारीख 17 रबी उल आखिर जमा दिल अव्वल 1442 हिजरी) या दिवशी जश्‍न - ए - गौस - ए - आजमच्या फातिहाखानी या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. मात्र कोरोना विषाणूच्या वाढत्या महामारी व संसर्गामुळे हा धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. 2 डिसेंबर ते 4 डिसेंबरपर्यंत दर्गा दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. 

आवाटी येथे प्रत्येक वर्षी बगदाद शरीफ येथील हजरत गौस - ए - पाक यांच्या स्मरणार्थ वली बाबा दर्गामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन दर्गा ट्रस्टच्या वतीने करण्यात येत असते. मात्र, या वर्षी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण भारतासह राज्यातही कमालीचे भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे भक्तांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या हेतूने व कोरोनाचा संसर्ग वाढू नये याकरिता दर्गा कमिटीने 3 डिसेंबर रोजीचा जश्‍न - ए - गौस - ए - आजमचा फातिहा खानीचा धार्मिक कार्यक्रम रद्द केला आहे. याची नोंद भाविकांनी घ्यावी व सहकार्य करावे, असे आवाहन वली बाबाचे खादिम इरफान कादरी व सुफी हसनैन कादरी (वली बाबा के दुलारे) यांनी भक्तगणांना केले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Overhead Cable : ओव्हरहेड केबल धोरणाला स्थायीची मान्यता; अनधिकृत केबल वर्षभरासाठी होणार नियमित

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT