Papaya 
सोलापूर

पंढरपूर तालुक्‍यात अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या द्राक्ष व पपई बागा भुईसपाट 

भारत नागणे

पंढरपूर (सोलापूर) : कासेगाव (ता. पंढरपूर) परिसरात गुरुवारी (ता. 18) पहाटे अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे द्राक्ष बागांना काही प्रमाणात फटका बसला आहे. अवकाळीमुळे हातातोंडाशी आलेले घास हिरावण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार बुधवारी (ता. 17) रात्री तालुक्‍याच्या अनेक भागात वादळी वारे सुटले व हलक्‍या पावसाच्या सरी कोसळल्या. यामध्ये रब्बी पिकांसह फळबागांचेही नुकसान झाले. 

गुरुवारी (ता. 18) पहाटेच्या सुमारास पुन्हा अवकाळी पाऊस झाला. हा पाऊस कासेगाव, लक्ष्मीटाकळी, खर्डी, कोर्टी, सरकोली परिसरात झाला. अवकाळी पावसामुळे या परिसरातील द्राक्ष बागांना फटका बसला आहे. गतवर्षी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिठीमुळे तालुक्‍यातील द्राक्ष हंगाम यंदाच्या महिनाभराने लांबला आहे. सध्या द्राक्ष काढणीचा हंगाम सुरू झाला आहे. अशातच दोन दिवसांपासून तालुक्‍याच्या विविध भागात अवकाळी पाऊस झाल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. 

लक्ष्मीटाकळी येथील शेतकरी सुरेश टिकोरे यांची 15 एकर क्षेत्रावरील निर्यातक्षम द्राक्ष काढणीस आली आहे. त्यापूर्वीच अवकाळीचा फटका बसला आहे. पावसाचे पाणी द्राक्ष घडांमध्ये शिरल्याने द्राक्ष मणी चिरण्याची भीती आहे. कासेगाव येथील शेतकरी सुनील भिसे यांची दोन एकर क्षेत्रावरील काढणीस आलेली पपईची बाग वादळी वारे आणि पावसामुळे भुईसपाट झाली आहे. यामध्ये भिसे यांचे सुमारे आठ ते दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. 

सरकोली येथे बुधवारी रात्री नाराळाच्या झाडावर वीज कोसळली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नाही. फळबागांबरोबरच रब्बी ज्वारी, गहू, हरभरा या पिकांचेही अवकाळीमुळे नुकसान झाले आहे. 

गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीतून शेतकरी काहीसे सावरत असतानाच पुन्हा अवकाळीचे संकट घोंगावू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये धास्ती वाढली आहे. 

दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे. द्राक्ष घडांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने मण्यांना तडे जाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी शेतकऱ्यांना अवकाळीच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. 
- सुरेश टिकोरे, 
द्राक्ष उत्पादक शेतकरी, लक्ष्मीटाकळी 

संपादन : श्रीनिवास दुध्याल
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: संजू सॅमसनचे शतक अन् CSK ची मुंबईत घुसून दादागिरी! आयपीएलमधील सर्वात मोठा विजय, गुणतालिकेत मोठी उलथापालथ

Video Viral : येडे गबाळे! PSL च्या टॉसच्या वेळेस मारामारी, डेव्हिड वॉर्नरला काय चाललंय कळेना... हसावं की पळावं? झाला कन्फ्युज...

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली मोठा गैरव्यवहार! महिलांकडून वसुली पूर्ण, पण पुरुषांवर निर्णय प्रलंबित का?

West Bengal Voting : स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच पश्चिम बंगाल-तामिळनाडूत विक्रमी मतदान, निवडणूक आयोगाचा मतदारांना सलाम

Sanju Samson Century: १० चौकार, ६ षटकार! संजूच्या शतकाने मोडले अनेक विक्रम; रोहित शर्माशी बरोबरी, गिलख्रिस्टवर पडला भारी

SCROLL FOR NEXT