Sangola Accident Esakal
सोलापूर

Sangola Accident: मोठी बातमी! सांगोल्यात पाच महिलांना ट्रकने चिरडले

Sangola News: दरम्यान या सर्व महिला कटफळ गावच्या असून, बंडगरवाडीतून कामावरून सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी गाडीची वाट बघत उभ्या होत्या.

आशुतोष मसगौंडे

सांगोल्यात एक भीषण अपघात घडला असून तालुक्यातील पंढरपूर-कराड मार्गावर भरधाव ट्रकने पाच महिलांना चिरडल्याचा प्रकार समोर आला आहे. शेतातील कामे आटोपून घरी माघारी जात असताना हा अपघात झाला.

यामध्ये मृत्यू झालेल्या सर्व पाच महिला सांगोला तालुक्यातील कटफळ गावच्या आहेत.

आज दुपारी चारच्या दरम्यान शेतातील काम करून घरी परतणाऱ्या 7 महिलांना, सांगोला तालुक्यातील चिकमहुद गावातील बंडगरवाडी येथे एका ट्रकने चिरडले. यापैकी पाच महिलांचा मृत्यू जागीच झाला तर यामधील दोन महिला गंभीर जखमी झाल्या.

दरम्यान या सर्व महिला कटफळ गावच्या असून, बंडगरवाडीतून कामावरून सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी गाडीची वाट बघत उभ्या होत्या.

या दरम्यान कोळसा घेऊन जाणारा एक ट्रक समोरून आला आणि थेट महिलांच्या अंगावार गेला. ट्रकच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात घडला.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून पुण्यासह राज्यभरात अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. एकट्या पुण्यात गेल्या महिन्याभरात 30 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

नागपूरमध्येही दोन दिवसांपूर्वी एका कारणे रस्त्याच्या कडेला झोपलेल्या 9 मजुरांना चिरडले होते.

या सर्व प्रकरणांमुळे राज्यातील सुरक्षित वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाना पाटेकरांनी सिंहगडाच्या पायथ्याशीच फार्महाऊस का बांधलं? पुरुषोत्तम बेर्डेंनी सांगितलं कारण, म्हणालेले- इथून महाराजांचे...

Akola District Drought : दुष्काळाच्या झळा; लोणी गावातील दुग्ध व्यवसाय संकटात! पाणी आणि चाऱ्याअभावी पशुपालक हवालदिल; म्हशी विकण्याची वेळ

Latest Marathi News Update : मसाल्यांमध्ये रंगांचा वापर चालणार नाही- तुकाराम मुंढे

Indian Army Alert: भारतात घुसण्यासाठी 500 दहशवादी रेडी! 'पीओके'मध्ये लपून बसल्याची माहिती; लष्कराकडे महत्त्वाचे इनपुट्स

US Work Permit Rules: ट्रम्प यांचा भारतीयांना मोठा झटका! वर्क परमिट संपल्यावर नोकरी जाणार?

SCROLL FOR NEXT