2kanda_20_282_29_20fb_0.jpg 
सोलापूर

कांद्याला चौदाशे रुपयांचा दर ! लॉकडाउनच्या भीतीने बाजार समितीत आला 350 ट्रक कांदा

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यात आणि सोलापूर शहर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे सुरू असलेल्या लॉकडाउनच्या चर्चेमुळे सोलापूर बाजारा कांद्याचा महापूर आला आहे. सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी तब्बल 350 ट्रक कांद्याची विक्रमी आवक झाली आहे.


पुढील आठवडाभर वाढेल आणखी आवक
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी 350 गाड्यांची आवक झाली. राज्यात लॉकडाउन आणि सलग सुट्ट्यांमुळे पुढील आठवडाभर कांद्याची आवक आणखी वाढेल, अशी शक्‍यता बाजार समितीतील अधिकाऱ्यांनी वर्तविली. कांदा हा नाशवंत माल असल्याने लॉकडाउन झाल्यास तो टिकणार नाही, याची भिती बळीराजाला आहे. विशेष म्हणजे राज्यात पुन्हा लॉकडाउन झाला, तर तो किती दिवसांचा असणार हेदेखील अनिश्‍चित आहे. त्यामुळे आवक वाढेल, असेही सांगण्यात आले.

गुडफ्रायडे (शुक्रवारी) आणि रंगपंचमीमुळे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीला सुट्टी होती. दुसरीकडे राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून राज्यात लॉकडाउनची शक्‍यता आहे. या पार्श्‍वभूमीवर सोलापूर जिल्ह्यासह परजिल्ह्यातील व परराज्यातील शेतकऱ्यांनी काढलेला कांदा विक्रीसाठी आणायला सुरवात केली आहे. सोलापूरच्या बाजार समितीत शनिवारी (ता. 3) तब्बल 350 ट्रक कांदा विक्रीसाठी आला होता. चांगला दर मिळेल, अशी अपेक्षा बळीराजाला होती. मात्र, उत्तम प्रतिच्या कांद्याला प्रतिक्‍विंटल 500 ते 1400 रुपयांचा दर मिळाला. तेवढ्या दरात शेतकऱ्यांनी समाधान व्यक्‍त केल्याचेही पहायला मिळाले. दरम्यान, सोमवार वगळता पुढील आठवड्यात पुन्हा दोन दिवस सुट्ट्या आहेत. त्यामुळेही आवक वाढल्याची शक्‍यता बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्‍त केली. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचाच सर्वाधिक कांदा होता, असेही सांगण्यात आले. तसेच पुणे, नगरसह कर्नाटकमधील विजयपूर येथूनही कांद्याची आवक होती. कांद्याची आवक वाढल्याने दर स्थिर होते. कांद्याला प्रतिक्‍विंटल किमान 300 रुपये, सरासरी 500 रुपये, सर्वाधिक 1400 रुपये इतका दर होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Purandar Airport: पुरंदर विमानतळासाठी ६० टक्के भूसंपादन; संमतिपत्रे सादर करण्यासाठी दोन दिवसांची मुदत, आतापर्यंत ९०० कोटी रुपयांच्या मोबदल्याचे वाटप

अभियांत्रिकी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना निवडता येतील 300 महाविद्यालये! प्रवेशासाठी लागणार ‘ही’ कागदपत्रे, जूनमध्येच प्रवेश नोंदणी, 4 प्रवेश फेऱ्या

Panchang 8 June 2026 : आजचे पंचांग! कालाष्टमी, मृग नक्षत्र प्रवेश आणि शुभ योग

साधे पोहे विसरा! वजन कमी करणाऱ्यांचा नवा फेव्हरेट ठरतोय हा 'फायबरयुक्त चिला'; जाणून घ्या सोपी रेसिपी

शेतकऱ्यांना आता ऑनलाईन बुकिंगशिवाय खते नाहीतच! आधार क्रमांक, जमीन, पिकाची माहिती, खतांची पोती, दुकानदार निवडावा लागणार; टोकनद्वारे 3 दिवसांत मिळेल खत

SCROLL FOR NEXT