सोलापूर

नव्या नियमानुसार घरकुलमध्ये  भाजी, किराणा मालाची विक्री 

श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी जुने विडी घरकुलमध्ये मंगळवारपासून (ता. 26) 31 मेपर्यंत जनता कर्फ्यू लागू करण्यात आला होता. त्याची मुदत आज (रविवारी) संपली. सोमवारपासून नवीन नियमावलीनुसार घरकुलमधील किराणा दुकाने व भाजी विक्रीचे नियोजन करण्यात आले होते, त्यानुसार आज नागरिकांची म्हणावी तशी गर्दी पाहावयास मिळाली नाही. 

हेही वाचा ः का केले एशएफआयने आंदोलन
विडी घरकुलमध्ये मंगळवारपासून जनता कर्फ्यू लागू करण्यात आला होता. त्याला अपवाद वगळता सर्वच नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. यादरम्यान विडी घरकुलमध्ये सात कोरोना व सारीबाधित रुग्ण आढळले. त्यापैकी गेल्या दोन दिवसांत दोन रुग्ण आढळले. त्यामुळे जनता कर्फ्यूचा कालावधी वाढवण्याचा निर्णय पुन्हा पुढे आला. नगरसेवक प्रथमेश कोठे व विठ्ठल कोटा यांनी एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत पाटील यांची रविवारी भेट घेतली. परिसरातील सर्व किराणा दुकानदार व भाजी विक्रेत्यांची बैठक संभाजीराव शिंदे शाळा येथे घेण्यात आली. त्या वेळी झालेल्या चर्चेतून, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जनता कर्फ्यू आणखी वाढवण्यापेक्षा दोन दिवस विक्रेते व ग्राहकांसाठी नवीन नियमावलीनुसार व्यवहार सुरू ठेवण्याचे सर्वानुमते ठरले. 

हेही वाचा ः रेन कार्ड असूनही स्वस्तधान्यापासून वंचित
सोमवारी नवीन नियमावलीनुसार सकाळी सात ते 11 पर्यंत किराणा व मटन-चिकनची दुकाने चालू होती. गर्दी टाळण्यासाठी भाजी मार्केटऐवजी विक्रेत्यांचे गट तयार करण्यात आले त्याप्रमाणे ठरलेल्या परिसरातच कुठेही न बसता फिरून भाजी विक्री करण्यात आल्यामुळे भाजी मार्केट सामसूम होते. मात्र किराणा दुकानदारांना ग्राहकांनी एका पिशवीत सामानाची यादी व मोबाईल क्रमांक द्यायचा व घरी जायचे, दुकानदाराने सामानाची पॅकिंग केल्यानंतर संबंधित ग्राहकाला दुकानाला बोलवायचे किंवा घरपोच डिलिव्हरी करायची, हा नियम काहीअंशी पाळण्यात आला नाही. तर काही दुकानांसमोर सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडाला. मटन-चिकन दुकानदारासमोर सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात आले. मात्र मास्क व हॅंडग्लोव्हज न वापरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी महापालिका पथक फिरकलेच नाही.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सलग पाचव्या दिवशी सोनं झालं स्वस्त! सर्वसामान्यांना मोठा दिलासा; 1 तोळा सोनं आता कितीला? पाहा आजचा ताजा भाव

Raid On Ambani Companies : अंबानींच्या कंपन्यांवर १० ते १२ ठिकाणी छापेमारी, १५ पथके तपासात

Latest Marathi News Live Update : बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव एमआरआय मशीन लोकार्पणाच्या प्रतीक्षेत; रुग्णांना आर्थिक फटका

IAF Sukhoi Crash : आसाममध्ये सुखोई विमान कोसळले; स्क्वाड्रन लेफ्टनंटसह महाराष्ट्राचे सुपुत्र पूर्वेश दुरगकर शहीद

Iran–Israel Conflict: बॉम्ब-मिसाईलच्या सावटाखाली दुबईत अडकले; घरी पोहोचताच ‘जीव भांड्यात पडला’ सातारा, सांगली, रत्नागिरीतील २६ जणांची सुटका

SCROLL FOR NEXT