Akkalkot Sakal
सोलापूर

Akkalkot : सलग सुट्यांमुळे अक्कलकोटमध्ये प्रचंड गर्दी

स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा; वाहतूक कोंडीची समस्या मात्र कायम

सकाळ वृत्तसेवा

अक्कलकोट : शनिवार व रविवारची सलग सुटी असल्याने अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी शुक्रवारी सायंकाळपासून अक्कलकोट येथे भाविकांनी मोठी गर्दी केली. शनिवारी सकाळी दर्शनासाठी भक्तांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या.

महिन्यातला दुसरा शनिवार असल्याने सार्वजनिक सुटी व रविवार सुटी असल्यामुळे तसेच शाळा १५ जूनपासून सुरू होणार असल्याने तत्पूर्वी अक्कलकोट श्री गुरुदत्तात्रयाचे चौथे अवतार म्हणून ओळखले जाणारे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली.

वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी दक्षिण द्वारातून मुरलीधर मंदिरमार्गे राजे फत्तेसिंह चौकापर्यंत भाविकांची लांबच लांब रांग लागलेली होती. ढगाळ वातावरण व मधूनच तीव्र उन्हामुळे भाविकांना प्रचंड उकाडा जाणवत होता.

उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी वटवृक्ष देवस्थान समितीने दक्षिणद्वार ते मुख्य गेटपर्यंत मंडप उभारले आहे. वटवृक्ष मंदिरात भाविकांना सुलभ दर्शन होण्यासाठी देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वस्त महेश गोगी, प्रथमेश इंगळे, श्रीशैल गवंडी, संजय पवार, पप्पू शिंदे, गिरीश पवार, महेश मस्कले आदी प्रयत्नशील होते.

या भागात होतेय वाहतुकीची कोंडी

शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास उकळी गल्ली तर राजे फत्तेसिंह चौक या मार्गावर अनेक वाहने अस्ताव्यस्त लावल्यामुळे दोन्ही बाजूंनी येणाऱ्या वाहतुकीला रस्ता मिळत नसल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती. तसेच शनिवारी राजे फत्तेसिंह चौक ते बेडर कन्हैया चौक मार्गावर दुतर्फा अनेक वाहने लावण्यात आल्याने ठिकठिकाणी वाहतुकीचा खोळंबा होत होता.

त्यानंतर श्रीमंत कमलाराजे चौक व राजे फत्तेसिंह चौक येथे बॅरिकेड्‌स लावण्यात आल्याने वाहतूक व्यवस्था सुरळीत झाली होती. शहरातील रिक्षांना शिस्त लावणे गरजेचे असून योग्य ठिकाणी रिक्षा स्टँड करणे व त्याबाबतचे नियम पाळणे महत्त्वाचे आहे.

वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीबद्दल खुद्द सोलापूरचे पोलिस अधीक्षक ग्रामीण व अपर पोलिस अधीक्षकांनी लक्ष घालण्याची वेळ आली आहे. अक्कलकोट उत्तर पोलिस ठाणेअंतर्गत येणाऱ्या वाहतूक शाखेला आणखी मनुष्यबळ देण्यात यावे व वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी, अशी मागणी स्वामीभक्तांतून होत आहे.

अन्नछत्र मंडळात महाप्रसादासाठी गर्दी

येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात प्रचंड गर्दी होऊनसुद्धा महाप्रसाद सेवा सुरळीतपणे चालू होती. अन्नछत्र मंडळात सुमारे ४० ते ५० हजार स्वामीभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. भक्तांना महाप्रसाद घेणे सुलभ व्हावे यासाठी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक- अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व अन्नछत्र मंडळाचे मुख्य कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव श्‍यामराव मोरे व विश्वस्त प्रयत्नशील होते.

अन्नछत्र मंडळातील बगीचा, शिल्पसृष्टी, कपिला गाय, स्वामींची भव्य मूर्ती व छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. तसेच नवसाला पावणाऱ्या श्री शमी विघ्नेश गणेश मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.

धार्मिक साहित्याच्या विक्रीत वाढ

येथील वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर परिसर व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ परिसरात असलेल्या धार्मिक साहित्य विक्रीच्या दुकानांतून स्वामीभक्त हार, नारळ, खडीसाखर, पेढे, अष्टगंध स्वामींची मूर्ती, स्फटिक माळ, प्रतिमा, स्वामींना अर्पण करायची वस्त्रे व विविध धार्मिक पुस्तके खरेदी करीत होते. या विक्रीतून लाखो रुपयांची उलाढाल होत होती. तसेच बसस्थानक ते मंदिर, अन्नछत्र व पुन्हा बसस्थानकाकडे जाण्यासाठी रिक्षांना मोठी मागणी होती.

समाधी मठाकडे जाणारा मार्ग चिंचोळा

येथील श्री स्वामी समर्थ महाराजांचे समाधी मठ बुधवार पेठ येथे असून, त्या ठिकाणी दर्शनासाठी भाविक नेहमी गर्दी करतात. मात्र, कारंजा चौक ते समाधी मठ व मल्लिकार्जुन मंदिर ते समाधी मठ हा मार्ग अत्यंत चिंचोळा आहे. त्यात या मार्गावरील विक्रेते धार्मिक साहित्य विक्री करण्यासाठी रस्त्यावर स्टॉल टाकलेले आहेत. त्यामुळे भक्तांना समाधी मठाकडे जाण्यासाठी अत्यंत चिंचोळा मार्ग राहतो. यामुळे भक्तांना नाहक त्रास होतो. हे दोन्ही मार्ग मोठे करण्यासाठी अक्कलकोट नगरपालिकेने लक्ष द्यावे, अशी मागणी परगावच्या स्वामीभक्तांतून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT