Humanity
Humanity Sakal
सोलापूर

माणुसकी जिवंत आहे; बार्शीच्या रिक्षाचालकाने केली ७० हजाराची बॅग परत

प्रशांत काळे

बार्शी (सोलापूर) : रिक्षाने प्रवास करताना चुकून मौल्यवान वस्तू अथवा पैशाची बॅग चुकून वाहनात विसरली तर परत मिळेल याबाबत शक्यता कमीच असते किंवा नसतेच! पण रिक्षाचालक प्रामाणिक असेल तर निश्चित विसरलेली वस्तू मिळते याचा अनुभव बार्शी (Barshi) शहरात आला असून रिक्षाचालकाने सत्तर हजार साठ रुपये रक्कम असलेली कापडी पिशवी पोलिस ठाण्यात जमा करुन समाजामध्ये आजही प्रामाणिकपणा असल्याचा आदर्श इतरांसमोर ठेवल्याने रिक्षाचालकाचे पोलिसांनी कौतुक केले आहे.

असे घडले की,आगळगाव रोड,सुभाषनगर भागात राहणारे मार्केट यार्डातील वयोवृद्ध व्यापारी राजेंद्र पाटील यांनी गुरुवारी दुपारी बारा वाजता रिक्षा क्रमांक MH 13 BV 1219 वाहन करुन मार्केट यार्ड येथे त्यांना सोडले.

बऱ्याच वेळानंतर रिक्षा चालक देविदास हरिश्चंद्र जाधव(वय 35 रा.पंकजनगर)याचे लक्षात आले की रिक्षामध्ये कापडी पिशवी कोणत्या तरी प्रवाशाची विसरली आहे कोणाची पिशवी असावी याबाबत काहींच समजेना त्यामुळे त्याने पिशवी सरळ बार्शी शहर पोलिस ठाण्यात आणून जमा केली.

पोलिस निरीक्षक रामदास शेळके यांनी पोलिस हवालदार श्रीमंत खराडे व पृथ्वीराज पवार यांना तपास करण्याचे आदेश देताच त्यांनी पोलिस जाणीव सेवा संघ व ओन्ली समाजसेवा संघ सदस्यांची मदत घेतली.

चौकशीमधून तपास करताच मार्केट यार्डातील गाळा नं.177 मधील वयोवृद्घ व्यापारी राजेंद्र पाटील यांची रक्कम ठेवलेली कापडी पिशवी असल्याचे निष्पन्न होताच रिक्षाचालकास पोलिसांनी बोलावून घेत त्याच्या हस्तेच रक्कमेसह पिशवी पाटील यांना परत केली.

रिक्षा चालक देविदास जाधव याच्या प्रामाणिकपणाबद्दल सेवा संघाचे उमेश आणेराव,राहुल वाणी,विजय माळी,रणजित कोठावळे यांचेसह पोलिस कर्मचाऱ्यांनी कौतुक केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

RCB खेळाडूंशी हस्तांदोलन न करताच परत गेलेल्या धोनीच्या शोधात विराटची CSK च्या ड्रेसिंग रुममध्ये धाव? Video व्हायरल

IPL 2024 RR vs KKR Live Score: राजस्थान-कोलकाता सामन्यात पावसाचा व्यत्यय; टॉसला उशीर

SCROLL FOR NEXT