31Corona_20akola_2001_1_3.jpg 
सोलापूर

संशय वाटल्यास घ्या तत्काळ उपचार ! बुधवारी उपचारादरम्यान 54 वर्षीय पुरुषाचा मृत्यू; आज 20 पॉझिटिव्ह

तात्या लांडगे

 सोलापूर : एमआयडीसी परिसरातील शिवलिंग नगरातील 54 वर्षीय पुरुषाच्या छातीत अचानकपणे 11 नोव्हेंबरला दुखू लागले. त्यांना तीन वर्षांपासून ह्दविकाराचा त्रास होता. बुधवारी (ता. 11) ते मार्कंडेय रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. दरम्यान, शहरात 370 संशयितांची आज टेस्ट झाली. त्यात 20 पॉझिटिव्ह तर एकाचा मृत्यू झाला आहे. तापसदृश्‍य आजारासंबंधी संशय वाटल्यास संबंधितांनी तत्काळ रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

ठळक बाबी... 

  • शहरातील एक लाख 9 हजार 260 संशयितांची कोरोना टेस्ट 
  • आतापर्यंत शहरात आढळले नऊ हजार 941 पॉझिटिव्ह रुग्ण 
  • आतापर्यंत शहरातील 552 रुग्णांचा कोरोनाने घेतला बळी 
  • शहरातील आठ हजार 934 रुग्णांनी केली कोरोनावर मात 
  • सध्या 455 रुग्णांवर सुरु आहेत विविध रुग्णालयांमध्ये उपचार

शहरात आज अवसे वस्ती (देगाव नाका), सवेरा नगर (सैफूल), प्रल्हाद नगर (एसआरपी कॅम्प परिसर), पारशी विहिरीजवळ (नई जिंदगी), लष्कर (दक्षिण सदर बझार), गांधी नगर, बेन्नूर नगर (नवीन आरटीओ कार्यालयाजवळ), अण्णासाहेब शाळेमागे, नारायण अपार्टमेंट (साखर पेठ), निर्मिती टॉवर (मोदीखाना) आणि मड्डे वस्ती, लोखंडवाला कॉम्प्लेक्‍स (जुळे सोलापूर), लोधी गल्ली (उत्तर सदर बझार) आणि उत्तर कसबा याठिकाणी नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यातील लोधी गल्ली, प्रल्हाद नगरात प्रत्येकी दोन तर उत्तर कसबा आणि लष्कर परिसरात प्रत्येकी तीन रुग्ण आढळले आहेत. सध्या शहरातील रुग्णांच्या संपर्कातील 104 संशयित होम क्‍वारंटाईन असून 45 संशयित इन्स्टिट्यूशनल क्‍वारंटाईनमध्ये आहेत. 24 जण होम आयसोलेशनमध्ये आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sukhoi Fighter Jet Crash : 'Purvesh Is No More..'! कॅप्टनचे ते शब्द ऐकताच पूर्वेशच्या वडिलांवर मोठा आघात; म्हणाले, 'छत्रपती शिवरायांचा त्याच्यावर..'

आगीत घर गमावलेल्यांना मोठी मदत! आग घटनेत बेघर झालेल्यांना जमीन देण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय; पण नेमकं कुणाला आणि कुठे?

बायकोनं केलेला आरोप खरा ठरला? खरंच थलपती विजयचं अभिनेत्रीसोबत अफेअर? सोशल मीडियावर दोघांचा Viral Video

US Missile Test: ‘डुम्सडे मिसाईल’ची यशस्वी चाचणी; अमेरिकेकडून पुन्हा शक्तिप्रदर्शन

Ro-Ro Boat: रो-रो फेरी सुरू होताच बंद, प्रवाशांचे आरक्षण पैसे परत; नेमके कारण काय?

SCROLL FOR NEXT