Solapur Crime Esakal
सोलापूर

Solapur Crime: पत्नी, मुलाचा खून करून शिक्षकाने संपवलं जीवन; घटनेने खळबळ, कारणही आलं समोर...

शिक्षिका पत्नी आणि १२ वर्षीय मुलाचा खून करून शिक्षकाने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बार्शी शहरात घडली.

सकाळ वृत्तसेवा

चारित्र्याच्या संशयावरून शिक्षिका पत्नी आणि १२ वर्षीय मुलाचा खून करून शिक्षकाने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बार्शी शहरात घडली. शिक्षक मानसिक रुग्ण होता. ही घटना काल (मंगळवार) सकाळी साडेनऊ वाजता उघडकीस आली. बार्शी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.(Latest Marathi News)

सोन्यासारखा संसार सुरू होता, पती-पत्नी दोघेही शिक्षक अन्अवघ्या बारा वर्षाचा गोंडस मुलगा. पण पत्नीने नोकरी करू नये, यावरुन दोघांमध्ये तंटा होत असे. तसेच पत्नीबद्दल संशयाचे भूतही शिक्षकाच्या मनात घोंघावत होते. शिक्षक मानसिक रुग्ण होता आणि यातूनच त्याने पत्नी, मुलाचा खून करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या करीत संसार उद्ध्वस्त केला. अतुल सुमंत मुंढे (वय ४२ रा. नाईकवाडी प्लॉट) असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. (Marathi Tajya Batmya)

तृप्ती अतुल मुंढे (वय ३७), ओम अतुल मुंढे (वय १२) अशी खून झालेल्यांची नावे आहेत. युवराज मुंढे यांनी पोलिसात माहिती दिली. मुलगा, सून आणि नातू वरच्या मजल्यावरून सकाळ होऊन उशीर झाला तरी खाली आले नाहीत, म्हणून सुमंत मुंढे यांनी जाऊन पाहिले असता, दार बंद होते. आवाज दिला तरी कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर शेजाऱ्यांना बोलावून दार उघडले असता, तिघेही मृत अवस्थेत असल्याचे आढळले.(Latest Maharashtra News)

घटनेची माहिती समजताच पोलिस उपअधीक्षक जालिंदर नालकूल, सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केल्यानंतर मृतदेह ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. एसटी महामंडळामध्ये वाहक म्हणून सेवानिवृत्त झालेले सुमंत मुंढे यांचा मुलगा अतुल तर नगरपरिषदेचे सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी विलास खाडे यांची मुलगी तृप्ती यांचा विवाह झाला होता. वांगी (ता. करमाळा) येथे जिल्हा परिषद शाळेत अतुल मुंढे शिक्षक म्हणून कार्यरत होता. तर तृप्ती मुंढे बार्शीतील अभिनव प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या.

अतुल मुंढे गंभीर मानसोपचार रुग्ण होता, त्याला अनेक दिवसापासून गोळ्या सुरू होत्या. तो ता. २६ रोजी बार्शीतील खासगी मानसोपचार रुग्णालयात तपासणीसाठी गेला होता. पंधरा दिवसांपासून त्याने गोळ्या बंद केल्या होत्या. शिक्षक अतुल मुंढे याने गळफास घेऊन आत्महत्या केली तर तृप्ती हिच्या गळ्याच्या मधोमध व छातीच्या उजव्या बाजूला चाकूने भोसकल्याने तिचा मृत्यू झाला तर ओम याचा उशीने नाक-तोंड दाबून खून करण्यात आला. अशी माहिती डॉ. रवींद्र माळी, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, बार्शी यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Municipal Corporation protest : महापालिका कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिघळले; महापौरांची गाडी पेटवण्याचा प्रयत्न, एक कर्मचारी जखमी

Pune Railway: पुणेकर रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! १९ सप्टेंबरपासून १५ दिवस रेल्वेचा मेगा ब्लॉक; ४२ गाड्या रद्द, २५ गाड्यांचे मार्ग बदलले

जरांगेंची प्रकृती खालावली, वजन ७ किलोंनी घटलं तर शुगरही कमी झाली; मंत्र्यांच्या आश्वासनानंतर घेतले उपचार

Marathi News Live Updates : जरांगेंचा अल्टिमेटम, मुंबईत हालचालींना वेग; मध्यरात्री मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक

Mumbai Goa Highway: उड्डाणपूल रखडला, कोंडी कायम; चिपळूणमधील सेवारस्त्यांवर गणेशोत्सवात वाहतुकीचा ताण

SCROLL FOR NEXT