ST Mahamandal Sakal
सोलापूर

ST Mahamandal : कार्तिकी यात्रा कालावधीमध्ये सोलापूर विभागाला एक कोटीहून अधिक उत्पन्न

कार्तिकी यात्रेनिमित्त यंदा लाखो भाविक श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी एस. टी. महामंडळाच्या बस गाड्यांमधून पंढरपुरात दाखल झाले होते.

राजकुमार घाडगे

पंढरपूर - कार्तिकी यात्रेनिमित्त यंदा लाखो भाविक श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी एस. टी. महामंडळाच्या बस गाड्यांमधून पंढरपुरात दाखल झाले होते. भाविकांच्या सेवेसाठी एस. टी. महामंडळातर्फे २२ ते २४ नोव्हेंबर दरम्यान सुमारे २ हजार ७०० विशेष यात्रा स्पेशल बसेस सोडण्यात आल्या होत्या.

या बसेसव्दारे २ हजार ५०० फेऱ्यांमधून १ लाख ५८ हजार ३५३ प्रवाशांनी प्रवास केला असून, यातून १ कोटी २३ लाख ८९ हजार रुपये उत्पन्न एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागाला मिळाले आहे अशी माहिती पंढरपूर बस आगार प्रमुख मोहन वाकळे यांनी 'सकाळ 'शी बोलताना दिली.

यावर्षी कार्तिकी यात्रेसाठी एसटी महामंडळाने यंदा प्रथमच पंढरीतील नवीन चंद्रभागा बसस्थानकाचा वापर केला होता. राज्यातील सर्वात मोठे बस स्थानक असलेल्या या बसस्थानकामध्ये एकूण ३६ फलाट आहेत. या ३६ फलाटाचे एकूण १७ विभाग पाडण्यात आले होते. यात्रे करिता २ हजार ७०० यात्रा स्पेशल बसेसचे नियोजन करण्यात आले होते.

कार्तिकी यात्रेला ये जा करण्यासाठी राज्यभरातील लाखो भाविकांनी या यात्रा स्पेशल जादा बसगाड्यांचा लाभ घेतला. त्यामुळे एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागाला कार्तिकी यात्रेदरम्यान १ कोटी २३ लाख ८९ हजार रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले. तर ७५ वर्षाहून अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास व महिला प्रवाशांना तिकीट दरात ५० टक्के सवलत या माध्यमातून एसटी महामंडळाने तब्बल ३८ लाख ४५ हजार ९२८ रुपये सवलत दिली.

कार्तिकी यात्रा कालावधीमध्ये भाविकांना सेवा देण्यासाठी सोलापूर विभाग नियंत्रक विनोद भालेराव, यंत्र विभाग अभियंता विवेक लोंढे, विभागीय वाहतूक अधिकारी श्री.पाटील यांच्यासह महामंडळाचे हजारो चालक, वाहक व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

कार्तिकी यात्रेदरम्यान रेल्वे विभागाला ५४ लाखाहून अधिक उत्पन्न: कार्तिकी यात्रेला येणाऱ्या भाविकांसाठी रेल्वे विभागाने यंदा ३६ यात्रा स्पेशल रेल्वे गाड्यांचे नियोजन केले होते. या रेल्वे गाड्यांच्या माध्यमातून १३३ फेऱ्यांमधून ९४ हजार ७३६ प्रवाशांनी प्रवास केला असून त्याद्वारे रेल्वे विभागाला ५४ लाख ३५ हजार ६१५ आर्थिक उत्पन्न मिळाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Danoli Village Shutdown Protest : “भरतेशला न्याय मिळालाच पाहिजे”, दानोळी गाव बेमुदत बंद; जिवाभावाचा भरतेश गेला भविष्य सुरक्षितेसाठी गाव एकवटलं

Pune Crime: पिंपरीत आंब्याच्या आमिषाने अडीच वर्षांच्या चिमुरडीला खोलीत बोलावून लैंगिक अत्याचार; ४७ वर्षीय आरोपीला अटक

G-Pay Pocket Money: Google Pay वर नवं ‘Pocket Money’ फीचर आलं! नेमकं काय आहे जाणून घ्या

झी मराठीवर नुकतीच सुरु झालेली दीप ज्योती आहे कन्नड मालिकेचा रिमेक ! अशी असेल पुढील कथा

Team India: 'गौतम गंभीरचे अनेक शत्रू, ५ सिलेक्टर्सपैकी ४ जणं....' माजी संघसहकाऱ्याचं खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT