vineyard loss sakal
सोलापूर

Untimely Rain : कासेगावात द्राक्षबागा जमीनदोस्त! पंढरपूर तालुक्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

पंढरपूर तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसात कासेगाव येथील फळावरील द्राक्षबागा जमीनदोस्त झाल्या.

सकाळ वृत्तसेवा

रोपळे बुद्रूक - पंढरपूर तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसात कासेगाव येथील फळावरील द्राक्षबागा जमीनदोस्त झाल्या. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

पंढरपूर तालुक्यात काल (शुक्रवारी) पंढरपूरसह भंडीशेगाव, भाळवणी, करकंब, पटवर्धन कुरोली, पुळूज, चळे, तुंगत व कासेगाव या सर्वच महसुली मंडलांत कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडला. पाऊस पडत असतानाच जोराचे वादळ आल्यामुळे काही भागात फळावरील द्राक्षबागा जमीनदोस्त झाल्या. यात सर्वाधिक फटका कासेगाव येथील शेतकऱ्यांना बसला.

कासेगाव हे द्राक्षबागांचे गाव म्हणून ओळखले जाते. येथे सुमारे दोन ते अडीच हजार एकर क्षेत्रावर द्राक्षबागा उभ्या आहेत. येथील द्राक्ष हंगाम सध्या सुरू आहे. द्राक्ष उतरविण्याची कामे सुरू आहेत. द्राक्ष बागांवर माल असतानाच येथे अवकाळी पावसाने हजेरी लावली. यात वादळ आल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या द्राक्षबागा जमीनदोस्त झाल्या. जमीनदोस्त झालेल्या द्राक्षबागा उभारण्याची कामे आज (शनिवारी) मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहेत.

कासेगाव येथील पांडुरंग देशमुख, सुधीर देशमुख, नानासाहेब देशमुख व पांडुरंग छोडके यांच्या द्राक्षबागेत फेरफटका मारला असता त्यांच्या द्राक्षबागा जमीनदोस्त झाल्याचे दिसून आले. यावेळी बहुतांश भागात द्राक्षबागा पुन्हा उभारण्याची कामे सुरू झाली आहेत. द्राक्ष मण्यांमध्ये पाणी साठून घड सडण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. तर अनेक शेतकऱ्यांच्या बागेत द्राक्षमणी चिरू लागल्या आहेत. पावसात माल भिजल्यामुळे द्राक्षांचे भाव कमी झाले. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

तालुक्यात मंडलनिहाय पडलेला पाऊस (मि.मी.)

पंढरपूर : ७.८, भंडीशेगाव : ९.३, भाळवणी : १४.५, करकंब : ८.५ , पटवर्धन कुरोली : ०.३, पुळूज : १.८, चळे : ०.३, तुंगत : ०.०, कासेगाव : ९.३

आमच्या भावाची द्राक्षबाग कोसळून मोठे नुकसान झाले आहे. आमच्या द्राक्षाच्या बागेतील द्राक्षमणी चिरू लागल्या आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांनी भाव पाडले आहेत.

- सुधीर देशमुख, द्राक्ष उत्पादक शेतकरी, कासेगाव, ता. पंढरपूरअक्कलकोट तालुक्यात पाऊण तास पाऊस

पंढरपूर तालुक्यात पडलेल्या अवकाळी पावसात पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे करण्याची कामे सुरू झाली आहेत. नेमके किती नुकसान झाले याची माहिती सायंकाळपर्यंत कळेल.

- सूर्यकांत मोरे, तालुका कृषी अधिकारी, पंढरपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्सची विजयी मालिका खंडित! सनरायझर्स हैदराबादचा शानदार विजय; IPL 2026 Points Table बदललं

IPL 2026: आश्चर्यच... ना विराट, ना शुभमन Orange Cap तिसऱ्याच कुणाकडे; Purple Capवर चेन्नईच्या गोलंदाजाने निर्विवाद वर्चस्व

'काँग्रेस, काँग्रेस आणि फक्त काँग्रेस...;' मोदींचा केंद्रबिंदू त्याच नावाभोवती फिरला, संपूर्ण भाषणात किती वेळा उल्लेख केला?

SRH vs CSK Live: ४,४,४,४,४,६! आयुष म्हात्रेचं वादळ हेनरिच क्लासनने रोखलं; अविश्वसनीय झेल घेत हैदराबादचं मैदान गाजवलं Video Viral

होर्मुझ संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक! समुद्री व्यापारासाठी ‘सुरक्षाकवच देणार; जहाजांसाठी मोठी खुशखबर

SCROLL FOR NEXT