सोलापूर

चक्‍क..आज लालपरीनेच पाहिली प्रवास्यांची वाट 

सकाळ वृत्तसेवा

मोहोळ (सोलापूर) : राज्यात कोरोनाच्या थैमानामुळे मागील अडीच महिन्यांपासून लॉकडाउन आहे. सर्व व्यवहारांसह बस सेवाही बंद होती. मागील तीन दिवसांपासून जिल्हा अंतर्गत बस सेवा सुरू करण्यात आली आहे. परंतु, अद्याप ग्रामीण भागातून कोरोनाच्या भीतीमुळे प्रवासी बसने प्रवास करण्यासाठी धजावत नाहीत. लालपरीवर प्रवाशांविना धावण्याची वेळ आली आहे. 

लालपरी तोट्यात 
गेल्या तीन दिवसांपासून मोहोळ बस स्थानकातून मोहोळ-बार्शी तीन फेऱ्या, मोहोळ-पंढरपूर दोन फेऱ्या, मोहोळ-वैराग तीन फेऱ्या, सोलापूर-पंढरपूर दोन फेऱ्या अशा अंतर्गत बस फेऱ्या सुरू केल्या आहेत. परंतु, प्रत्येक फेरीला दोन-तीन प्रवाशांव्यतिरिक्त प्रवास करण्यासाठी ग्रामीण भागातील प्रवासी धाडस करीत नाहीत. त्यामुळे सध्या तरी लालपरी तोट्यात चालताना दिसत आहे. 

प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद 
मागील तीन दिवसांपासून एसटीची सेवा सुरू करण्यात आली; मात्र कोरोनाच्या भीतीमुळे प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. प्रवाशांचा प्रतिसाद वाढल्यावर बस फेऱ्या वाढविल्या जातील. 
- बबलू देसाई, 
वाहतूक नियंत्रक, मोहोळ बस स्थानक

 

केवळ दोन प्रवासी आले 
आम्ही आता वैराग-मोहोळ ही बस घेऊन आलो आहोत. केवळ या प्रवासात दोन प्रवासी आले आहेत. 
- पी. डी. शिंदे, वाहक 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांची तिहार तुरुंगातून सुटका, 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन

Fact Check: लालकृष्ण अडवाणी राहुल गांधींना 'भारतीय राजकारणातील हिरो' म्हटले नाहीत, फेक पोस्ट व्हायरल

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंमुळे गोविंदाची उडाली तारांबळ; 20 मिनिटं हॉटेलबाहेर ताटकळत उभं राहावं लागलं

Brij Bhushan Singh : ब्रिजभूषण सिंह विरोधात सबळ पुरावे हाती! कोर्टाकडून आरोप निश्चित करण्याचे आदेश

Pradip Sharma Case : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; नियमित जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT