police bharti news sakal
सोलापूर

Police Bharti: लर्निंग परवाना, उंची कमी असतानाही भरले अर्ज! ‘मैदानी’ला ३४५ जणांची दांडी; त्यांना पुन्हा संधी नाही

सोलापूर शहर व ग्रामीण पोलिस दलाची भरती प्रक्रिया सोमवारी सुरु झाली. पहिल्या दिवशी आठशे उमेदवारांना बोलावले होते. परंतु, तब्बल ३४५ उमेदवारांनी पहिल्याच दिवशी मैदानी चाचणीला दांडी मारली. दुसरीकडे ५९ उमेदवार अपात्र ठरले.

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर शहर व ग्रामीण पोलिस दलाची भरती प्रक्रिया सोमवारी (ता. २) सुरु झाली. पहिल्या दिवशी आठशे उमेदवारांना बोलावले होते. परंतु, तब्बल ३४५ उमेदवारांनी पहिल्याच दिवशी मैदानी चाचणीला दांडी मारली. दुसरीकडे ५९ उमेदवार अपात्र ठरले. जे उमेदवार आले नाहीत, त्यांना या भरतीत पुन्हा संधी नाहीच.(Police Bharti News)

राज्याच्या गृह मंत्रालयातर्फे राज्यभरात १८ हजारांहून अधिक पोलिस शिपाई व चालकांची पदे भरली जात आहेत. त्यात शहर पोलिस आयुक्तालयातील ७३ चालक व ९८ पोलिस शिपाई पदांचा समावेश आहे. तसेच ग्रामीण पोलिस दलात २८ चालक व २६ पोलिस शिपाई पदे भरली जात आहेत. पहिल्यांदा उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली जात आहे. त्यातही सुरवातीला चालक व त्यानंतर शिपाई पदासाठी अर्ज केलेल्यांची मैदानी चाचणी होणार आहे. दरम्यान, उद्या (मंगळवारी) शहर पोलिसांनी ९०० तर ग्रामीण पोलिसांनी ४०० उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलावले आहे. शहर पोलिस आयुक्तालयाची मैदानी चाचणी २० जानेवारीपर्यंत चालणार असून ग्रामीण पोलिसांतर्फे सुरु असलेली मैदानी चाचणी १० जानेवारीला संपणार आहे. भरती प्रक्रिया पारदर्शक पार पडावी, यासाठी मैदानाच्या चौहुबाजूंनी सीसीटीव्ही कॅमेरे, व्हिडिओ शुटिंग कॅमेरे लावले आहेत. सोमवारी भरतीच्या ठिकाणी पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने, पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे हे स्वत: काही तास मैदानावर ठाण मांडून बसले होते.

गैरहजर उमेदवारांना पुन्हा संधी नाही

पहिल्या दिवशी (सोमवारी) शहर पोलिस आयुक्तालयाने ६०० तर ग्रामीण पोलिसांनी २०० उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलावले होते. मात्र, शहरातील भरतीकडे २७३ तर ग्रामीण पोलिस भरतीकडे ७२ उमेदवारांनी गैरहजेरी लावली. कॉल लेटर देऊन उमेदवारांना ज्या दिवशी मैदानी चाचणीसाठी बोलावले, त्याच दिवशी त्यांची हजेरी अनिवार्य आहे. गैरहजर उमेदवारांना पुन्हा मैदानी चाचणीसाठी संधी मिळणार नाही. मैदानी न दिल्याने त्यांना लेखी चाचणी देखील देता येणार नाही, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

कोणाची उंची कमी, कोणाची कागदपत्रे अपूर्ण

शहर पोलिस आयुक्तालयात भरतीसाठी पहिल्या दिवशी ६०० पैकी ३२७ उमेदवार उपस्थित राहीले. त्यातील ३७ जण पडताळणीतच अपात्र ठरले. दुसरीकडे ग्रामीण पोलिसांत भरतीसाठी दोनशे उमेदवारांना बोलावले होते, त्यातील १२८ उमेदवार उपस्थित होते. त्यातील २२ उमेदवार अपात्र ठरले. चालकासाठी पहिल्यांदा मैदानी होत असून काही उमेदवारांकडे लर्निंग परवाना होता, तरी त्यांनी अर्ज केले होते. तर काहींची उंची व वय कमी होते. काहीजणांकडे कागदपत्रे अपूर्ण होती, अशी माहिती पोलिस उपायुक्त अजित बोऱ्हाडे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वडिलांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारच केले नाहीत; मृतदेह प्रिझर्व्ह करून ठेवला, मुंबईतील खळबळजनक घटना

Malvan Accident : दुचाकीच्या धडकेत भाजप नगरसेविकेसह चौघे जखमी, सरकारी दवाखान्यात एक्स रे मशीन बंद असल्याने संताप

LPG Cylinder Price: उद्यापासून गॅस सिलेंडर महागणार? महाराष्ट्रात आज कितीला मिळतो LPG, पाहा शहरनिहाय दर

Pradip Purnekar case: ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याच्या हत्येचा CCTV फुटेज समोर, ७ गोळ्या झाडल्याचा आवाज

Ayush Thite Organ Donation : सोलापूरच्या आयुषच्या हृदयाने रशियातील तीन वर्षांच्या चिमुकल्याला मिळणार नवजीवन; अवयवदानाने वाचणार चौघांचे प्राण

SCROLL FOR NEXT