सोलापूर

अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना दिली नियुक्तीची पत्रे 

सकाळवृत्तसेवा

सोलापूर ः वडाळा (ता. उत्तर सोलापूर) येथील हनुमान मंदिरात अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या उत्तर सोलापूर तालुका पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वाटप, वडाळा शाखेचे उद्‌घाटन व आर्सेनिक अल्बम रोगप्रतिकारकशक्ती वाढविणाऱ्या गोळ्यांचे वाटप अखिल भारतीय वारकरी मंडळाचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष ह. भ. प. प्रकाश बोधले महाराज यांच्या हस्ते झाले. 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बळीराम साठे होते. कार्यक्रमावेळी वारकरी मंडळाचे जिल्हाध्यक्ष डॉ. किरण बोधले महाराज, जिल्हा मुख्य सचिव रंगनाथ काकडे महाराज, दिंडी व सप्ताह समितीचे जिल्हाध्यक्ष काकासाहेब पाटील, रमेश शिवापूरकर, राज्य कार्यकारणी सदस्य दिगंबर फंड, जिल्हा उपाध्यक्ष अभिमान पाटील, देविदास साठे, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जितेंद्र साठे, सतीश सुरवसे, तानाजी कोळी, दिलीप साबळे, मिलींद साठे, मनोज साठे, परमेश्‍वर शिंदे, गोवर्धन मॅकल, श्रीधर लोंढे, गणेश शिंदे, पांडुरंग पवार, विश्‍वास साठे, प्रशांत राजपूत उपस्थित होते. 
संत ज्ञानेश्‍वर माऊली व जगतगुरु तुकोबारायांच्या विचारसरणीनुसारच अखिल भारतीय वारकरी मंडळाचे कार्य सुरु असून या संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण देशातील वारकऱ्यांमध्ये ऐक्‍य साधू. अध्यात्मिक व सामाजिक विकासाची सांगड घालून भागवत संप्रदायाचे अधिष्ठान असलेली समाजाला व देशाला अभिमान वाटावा, अशी पिढी घडविण्याचे काम सुरु असल्याचे प्रतिपादन मंडळाचे संस्थापक बोधले महाराज यांनी येथे केले. यावेळी जिल्हाध्यक्ष किरण बोधले, रंगनाथ काकडे यांचीही भाषणे झाले. 
ह. भ. प. यशवंत गायकवाड महाराज यांचा त्यांच्या वाढदिवसानिम्मित सत्कार केला. तालुकाध्यक्ष पदी त्यांच्या निवडीचे प्रमाणपत्र देण्यात आले. लहू पाटील, चंद्रशेन पाटील, दत्तात्रय मोकाशी, धोंडीबा माळी, वसंत साठे, बाळासाहेब सुतार यांच्या निवडीचे पत्रे देण्यात आली. यावेळी पांडुरंग साठे, गोपाळ शेंडगे, रामहरी शेंडगे, साधना वाणी, अरुणा कारंडे, प्रतिभा साठे, दिपाली साठे, सुप्रिया देशमुख, नारायण सुभेदार, तुळशीदास फंड, तानाजी कोळी, सुनिल शिंदे यांची नव्याने निवड केली. यशवंत गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. दत्तात्रय मोकाशी यांनी सूत्रसंचालन केले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Konkan MLC Bala Mane : कोकण विधान परिषद बिनविरोध, बाळ मानेंची माघार, ठाकरे गटाकडून मानेंची हकालपट्टी

स्वप्नील पाठोपाठ सतीश राजवाडेंनीही थांबवला चालू नाटकाचा प्रयोग, 'हे' होतं कारण !

Revdanda Bridge : कोकणचा प्रवास होणार सुपरफास्ट! 1200 कोटींच्या रेवदंडा खाडीपुलाच्या कामाला वेग; वळसा घालून जाण्याचा फेरा वाचणार, कधीपर्यंत पूर्ण होणार प्रकल्प?

Pune Legislative Council election : पुणे विधानपरिषद निवडणुकीत मोठी घडामोड; सुनील टिंगरे यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे

Latest Marathi News Live Update : नांदेड जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाचे आगमन

SCROLL FOR NEXT