Mahud Action 
सोलापूर

कोरोनाविरुद्ध उतरले तहसीलदार मैदानात ! विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई; मोफत मास्कही वाटप

उमेश महाजन

महूद (सोलापूर) : कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला असतानाही, नागरिकांमध्ये याचे अजूनही गांभीर्य दिसून येत नाही. यासाठी सांगोल्याचे तहसीलदार अभिजित पाटील यांनी स्वतः महूदला भेट देऊन विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. या वेळी सुमारे दहा हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, तर शासनाच्या वतीने मोफत मास्कचेही वाटप करण्यात आले. 

तहसीलदार अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महूद (ता. सांगोला) येथे महसूल प्रशासनाच्या वतीने विनामास्क फिरणारे मोटारसायकल चालक, दुकानदार, विक्रेते यांच्यावर कारवाई केली. यामध्ये सुमारे दहा हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. विनामास्क फिरणाऱ्यांना प्रत्येकी शंभर रुपयांचा दंड करण्यात आला व त्यांना मास्कही देण्यात आले. ही कारवाई महूद येथील मुख्य चौक, प्राथमिक शाळा परिसर, ग्रामपंचायत कार्यालय, जुनी बाजारपेठ आदी भागात करण्यात आली. तहसीलदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंडलाधिकारी दिनेश भडंगे, तलाठी गणेश भुजबळ, पोलिस कर्मचारी गणेश तनमोर, पोलिस पाटील प्रभाकर कांबळे, श्री. मेटकरी यांनी ही कारवाई केली. 

या वेळी तहसीलदारांनी नागरिकांशी संवाद साधताना, कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता नागरिकांनी घरातून बाहेर पडताना मास्क वापरले पाहिजेत. शारीरिक अंतर पाळले पाहिजे. दुकानदारांनी, व्यापाऱ्यांनी तसेच प्रत्येक नागरिकांनी मास्क वापरावा. व्यापाऱ्यांनी तसेच इतर व्यावसायिकांनी दुकानासमोर चौकोनी पट्टे आखावेत. मंगल कार्यालय व लग्न समारंभ या ठिकाणी गर्दी करू नये. लोकांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे व कोरोनापासून आपले व आपल्या कुटुंबाचे संरक्षण करावे, असे आवाहन केले 

महूद हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला होता. त्यामुळे कोरोनाचा उद्रेक टाळण्यासाठी प्रत्येकाने नियम पाळले पहिजेत. सध्या दंडात्मक कारवाई केली जात असून यापुढे जो कोणी नियमांचे पालन करणार नाही, त्याच्यावर कठोर कारवाई करून गुन्हा दाखल केला जाईल. 
- अभिजित पाटील, 
तहसीलदार सांगोला 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jintur Agitation : जिंतूरात बंजारा आंदोलनाला हिंसक वळण; उपोषणकर्ते विनोद आडे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड, रास्ता रोकोने शहरात खळबळ

Marathi News Live Updates: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ५ दिवस पावसाचा अंदाज

Nirgudsar News : कृषीपंपांच्या केबलवर चोरट्यांचा डल्ला

Junnar News : जुन्नर शहरात श्री तुळजाभवानी माता पलंगाच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी

FOREIGN JOB OPPORTUNITIES: या राशींच्या लोकांना मिळू शकते परदेशात जाण्याची संधी; करिअर आणि पैशांसाठी ठरू शकतो मोठा टर्निंग पॉइंट

SCROLL FOR NEXT