सोलापूर

सावधान.... गड किल्ल्यांवर मद्यपान ; मग तयार रहा `या` शिक्षा भोगायला

विजयकुमार सोनवणे

सोलापूर : महाराष्ट्रातील गड किल्ले हे महाराष्ट्राच्या सुवर्ण इतिहासाचे साक्षीदार आहेत. या गडकिल्ल्यांचे पूर्णपणे पावित्र्य राखणे गरजेचे आहे. मात्र, या गडकिल्ल्यांना भेट देताना काही समाजकंटक मद्यपान करुन सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालतात.

गृह विभागाने केला आदेश जारी
महाराष्ट्र सार्वजनिक दारूबंदी कायद्याची कडक अंमलबजावणी केली असून गड किल्ल्यावर गैरवर्तन करणाऱ्यांना ही शिक्षा लागू होणार आहे. गड किल्ल्यांचे पावित्र्य भंग करणाऱ्या तळीरामांवर आणि गैरवर्तणूक करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई केली जाणार असल्याची आदेश गृह विभागाने जारी केला आहे.

पावित्र्य राखण्यासाठी उचलले पाऊल 
या गडकिल्ल्यांचे पूर्णपणे पावित्र्य राखणे गरजेचे आहे. मात्र, या गडकिल्ल्यांना भेट देताना काही समाजकंटक मद्यपान करुन सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालतात. सार्वजनिक शांततेस बाधा पोहचेल असे गैरप्रकार, गैरवर्तन करणे, किल्ल्यावरील वैभवशाली पुरातन वास्तूचे नुकसान करणे यासारखे पावित्र्य भंग करण्याचे प्रकार करीत आहेत. अशा प्रकारे गड, किल्ल्यांचे पावित्र्य भंग करणाऱ्या समाजकंटकांना आळा बसावा या दृष्टीकोनातून राज्य सरकारकडून सूचना देण्यात आल्या आहेत.

शिक्षेचा फलक लागणार प्रवेशद्वारावर 
ज्या ठिकाणी मद्य प्राशन करण्यास परवानगी देण्यात आली आहे, अशी जागा वगळता अन्य सार्वजनिक ठिकाणी दारुच्या नशेत गैरशिस्तीने वागल्यास, या गैरवर्तनाबाबत महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, 1949 (सन 1949 चा 25) मधील कलम 85 अन्वये शिक्षेबाबतच्या तरतूदी करण्यात आल्या आहेत. यामध्ये करण्यात आलेल्या शिक्षेबाबतच्या तरतूदी ठळकपणे नमूद केलेला शिक्षेच्या तरतुदीचा माहिती फलक पुरातत्व विभागामार्फत गड, किल्ल्यांच्या प्रवेशद्वाराजवळ दर्शनी भागात लावण्यात येणार आहेत.

या आहेत शिक्षा...
- पहिल्या अपराधाबद्दल सहा महिने सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंड
- दुसऱ्यावेळी अपराधाबद्दल एक वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंड

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : चारच्या पुढे बेस-टॉप असल्यास गुन्हा दाखल होणार; साऊंड सिस्टिम जप्त करण्याचा पोलिसांचा इशारा

Devendra Fadnavis meets Anna Hazare : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अण्णा हजारेंच्या भेटीला; महिनाभरापासून ताप आणि जुलाबाचा त्रास, बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार

माजी माओवादी नेता भूपतीवर मोठी जबाबदारी; विद्यापीठात समन्वयक म्हणून करणार मार्गदर्शन

Eknath Shinde Delhi Visit : एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौरावर; धनुष्यबाण चिन्ह गोठणार?, मुलगा श्रीकांत शिंदेंना मंत्रीमंडळात संधी मिळणार?

Marathi News Live Updates : सावरगाव परिसरात वन्यजीवांच्या शिकारीचा प्रयत्न, दोन आरोपी फरार; बंदुकीसह दुचाकी जप्त

SCROLL FOR NEXT