Ramesh Baraskar sakal
सोलापूर

Maharashtra Kesari : नवीन महाराष्ट्र केसरी फेडरेशन तयार करणार - रमेश बारसकर

महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेणाऱ्या फेडरेशन वरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नवीन महाराष्ट्र केसरी फेडरेशन तयार करून सोलापूर जिल्ह्यातून प्रथम नवीन महाराष्ट्र केसरी स्पर्धेला सुरुवात करणार.

राजकुमार शहा

महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेणाऱ्या फेडरेशन वरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नवीन महाराष्ट्र केसरी फेडरेशन तयार करून सोलापूर जिल्ह्यातून प्रथम नवीन महाराष्ट्र केसरी स्पर्धेला सुरुवात करणार.

मोहोळ - महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेणाऱ्या फेडरेशन वरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नवीन महाराष्ट्र केसरी फेडरेशन तयार करून सोलापूर जिल्ह्यातून प्रथम नवीन महाराष्ट्र केसरी स्पर्धेला सुरुवात करणार असल्याची माहीती मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी दिली.

शनिवार ता 14 रोजी पुणे येथे महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली. त्या स्पर्धेला सुरुवाती पासूनच ठरवून स्पर्धा होत आहेत असे वातावरण होते. सुरुवातीचे लॉट्स अंतिम कुस्ती पर्यंत या मध्ये स्पर्धा पंच कमेटी आहे. या पंच कमेटीच्या सदस्यांनी या स्पर्धेला गालबोट लावले. पहिल्यांदा लॉट्स पाडत असताना संशय निर्माण होईल असे एकाच तालमी तील मल्लांचे आमने सामने लॉट्स पाडले गेले. या बद्दल संशय घेण्यास जागा आहे.

माती विभागातील अंतीम कुस्ती सिकंदर शेख विरूद्ध महेंद्र गायकवाड या कुस्ती बद्दल पंच कमेटी कडून दुजाभाव झाला आहे असे निदर्शनास आले.कारण पहिला पॅसिव्ह पॉईंट हा महेंद्र गायकवाड याला देण्यात आला. त्या बद्दल हा संशय निर्माण झाला आहे. सिकंदर शेख यांनी डाव केलेला असताना बचावा च्या पवित्र्यात महेंद्र गायकवाड यांनी टांग मारली, त्यावेळी कुस्ती मैदानाच्या बाहेर गेली होती. नियमा नुसार दोन पॉईंट देणे अपेक्षित असताना चार देण्यात आले.तेव्हा सिकंदर शेख च्या कोच नी हरकत घेतल्यानंतर एक पॉईंट सिकंदर ला देण्यात आला.

रिप्ले पाहून देखील दोनच्या ठिकाणी चार पॉईंट महिंद्र गायकवाड ला देण्यात आले. त्यामुळे अत्यंत उत्तम नियोजन केलेल्या मुरलीधर मोहोळ यांनी कष्ट घेऊन स्पर्धा घेतल्या, अशा महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा आज पर्यत झाल्या नव्हत्या. अशा प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या,परंतू चुकीच्या पंचगिरी मुळे संपूर्ण महाराष्ट्र केसरी स्पर्धेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

त्यामुळे नवीन महाराष्ट्र केसरी फेडरेशन तयार करण्यात येणार आहे, त्याच वेळी निर्विवाद स्पर्धा होतील, शिवाय एखाद्या खेळाडू वर अन्याय होता कामा नये.त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातून नवीन महाराष्ट्र केसरी स्पर्धेला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश चिटणीस रमेश बारसकर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Airport: विमानतळांच्या खासगीकरणात सरकारचा नवा नियम! एका कंपनीला मर्यादित एअरपोर्टच मिळणार; बिडिंग कॅप लागू होणार

DJ Sound : तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच! पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट जप्ती

Mohol News : 'प्रेस' लिहिलेल्या वाहनावर मोहोळ पोलीस करणार कारवाई, डिजिटल फलकावर आता लिहावा लागणार कालावधी मोहोळ पोलिसांचा निर्णय

Video: Ruturaj Gaikwad ची १० वर्षांची तपश्चर्या भंगली! धाव घेताना गोंधळ उडाला अन् जे कधीही घडलं नव्हतं, ते घडलं

Tamil Nadu TET Exemption : शिक्षकांना मोठा दिलासा! TET मधून सुटका होणार? विजय सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT