draupadi murmu and mp dhananjay mahadik sakal
सोलापूर

Mohol News : खा. धनंजय महाडिक यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना दिले कोल्हापूर भेटीचे आमंत्रण, केला सन्मान

राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी नुकतीच भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांची सहकुटुंब भेट घेतली.

राजकुमार शहा

मोहोळ - राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी नुकतीच भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांची सहकुटुंब भेट घेतली. या भेटीत खासदार महाडिक यांनी राष्ट्रपतींना कोल्हापूर भेटीचे आमंत्रण दिले असल्याची माहिती खा धनंजय महाडिक यांनी दिली.

या संदर्भात दिलेल्या माहिती नुसार, कोल्हापूर जिल्ह्याची ऐतिहासिक परंपरा, संपन्न वारसा, कला, क्रीडा,कृषी व उद्योग क्षेत्रातील दैदिप्यमान कामगिरी याबद्दल खासदार महाडिक यांनी राष्ट्रपती मुर्मु यांना सविस्तर माहिती दिली.

सहकार क्षेत्रात आघाडीवर असलेल्या व कोल्हापुरी गूळ,साज, पादत्राणे या सह विविध खाद्य पदार्थांसाठी प्रसिद्ध असलेल्या परंपरांची, खासदार महाडिक यांनी माहिती दिली. साडेतीन शक्ती पीठांपैकी एक शक्तीपीठ असलेल्या कोल्हापूरच्या श्री अंबाबाई च्या दर्शनासाठी राष्ट्रपतींना निमंत्रण दिले. राष्ट्रपती मुर्मू यांनी महाडिक परिवाराशी संवाद साधला व कोल्हापूरच्या इतिहास परंपरांची माहिती जाणून घेतली.

यावेळी खा. महाडिक यांच्या पत्नी अरुंधती महाडिक यांनी भागीरथी संस्थेमार्फत सुरू असलेल्या महिला सक्षमीकरणाच्या उपक्रमांची माहिती दिली. जिल्ह्यातील सुमारे 20 हजार महिलांना प्रशिक्षण देऊन, त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी भागीरथी संस्थेच्या माध्यमातून यश प्राप्त झाल्याचे सांगितले, त्याबद्दल राष्ट्रपतींनी समाधान व्यक्त केले.

शासकीय योजना अधिकाधिक महिलां पर्यंत पोहोचाव्यात आणि त्यातून महिला आत्मनिर्भर व्हाव्यात, अशी अपेक्षा राष्ट्रपती मुर्मु यांनी यावेळी व्यक्त केली. दरम्यान महाडिक परिवार आणि समस्त कोल्हापूरकरांच्या वतीने राष्ट्रपतींचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी पृथ्वीराज महाडिक, वैष्णवी महाडिक, अमरेंद्र महाडिक, विश्वराज महाडिक, कृष्णराज महाडिक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swami Avimukteshwaranand : स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना मोठा दिलासा; अलाहाबाद उच्च न्यायालयाने अटक स्थगित केली

Rashmika wedding: ना पुरोहित , ना अग्नि; तरीही पवित्र! जाणून घ्या रश्मिका–विजयच्या कोडावा पद्धतीतील विवाहसोहळ्यामागील अनोख्या परंपरा

Silver Buying Tips : ऑनलाइन सिल्वर ज्वेलरी खरेदी करताय? मग बनावट चांदीपासून राहा सावध, आत्ताच पाहा फेक ओळखायच्या 'या' 5 ट्रिक्स

Akola News : स्मार्ट मीटरचा पातूर पोलीस स्टेशनला दणका; चार महिन्यांचे ५२ हजार रुपये बिल थकीत, वीजपुरवठा खंडित

Crime: भयंकर! क्षुल्लक वाद विकोपाला गेला; २१ वर्षीय तरूणाने १२ वर्षीय भावाला संपवलं, अमरावतीत धक्कादायक कृत्य

SCROLL FOR NEXT