MSEDCL 
सोलापूर

अतिवृष्टीचा फटका ! सांगोल्यात महावितरणचे 50 लाखांचे नुकसान 

दत्तात्रय खंडागळे

सांगोला (सोलापूर) : सांगोला तालुक्‍यात अतिवृष्टीचा तडाखा बसल्याने 50 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज महावितरणने वर्तविला आहे. अतिवृष्टी व पुरामुळे शेकडो रोहित्रे (ट्रान्स्फॉर्मर) बाधित झाली होती. विद्युत मीटर, रोहित्र, विद्युत खांब, विद्युत वाहिन्या आणि उपकरणांच्या नुकसानीबरोबरच विद्युत पुरवठा बंद असल्यामुळे झालेले महसुली नुकसानही मोठे आहे. पूरस्थिती ओसरल्यानंतर युद्धपातळीवर प्रयत्न करत घरगुती वीज ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला असल्याची माहिती महावितरणचे उपकार्यकारी अभियंता आनंद पवार यांनी दिली. 

सांगोला तालुक्‍याला अतिवृष्टी व पुराचा सर्वाधिक तडाखा बसला आहे. माण नदीकाठच्या व कासाळ ओढ्याकाठच्या शेतीचे तसेच महावितरणचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महावितरणचे सुमारे 50 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तालुक्‍यातील कृषी व घरगुती वीज वाहिन्यांवरील वीज यंत्रणेला फटका बसला आहे. सांगोला तालुक्‍यात अतिवृष्टी व पुरामुळे महावितरणचे 91 उच्चदाब विद्युत वाहिन्यांचे खांब, 96 लघुदाब विद्युत वाहिन्यांचे खांब मोडून पडले आहेत. तसेच 40 उच्चदाब विद्युत वाहिन्यांचे खांब, 46 लघुदाब विद्युत वाहिन्याचे खांब वाकले आहेत. तर पाच ठिकाणचे ट्रान्स्फॉर्मर पडल्याने रोहित्रांमधून होणारा विद्युत पुरवठा खंडित झाल. त्यातील काही रोहित्रांचा वीज पुरवठा पूरस्थितीमुळे बंद करावा लागला. हजारो घरगुती व कृषी ग्राहकांचा वीजपुरवठा बंद पडला. 

महावितरणचे उपकार्यकारी अभियंता आनंद पवार व कर्मचाऱ्यांनी पूरस्थिती ओसरल्यानंतर युद्धपातळीवर प्रयत्न करत अवघ्या तीन दिवसांत घरगुती ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात यश मिळवले आहे. मात्र अनेक विहिरी गाळाने भरल्या असल्याने तसेच चिखलामुळे कृषी वीजपंपाचा विद्युतप्रवाह सुरू करण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. जवळपास 650 कृषी वीजपंपांचा वीजपुरवठा सुरू करण्यासाठी आठ ठेकेदारांची नियुक्ती केली आहे. ठेकेदार, महावितरणचे शाखा अभियंता व कर्मचाऱ्यांच्या मदतीने एका आठवड्यात कृषी पंपाचा वीजपुरवठा सुरळीत होणार असल्याची माहिती उपकार्यकारी अभियंता श्री. पवार यांनी दिली. 

इतर परिमंडलातून पॉवर ट्रॉन्स्फॉर्मर, रोहित्रे, लोखंडी वीजखांब, वीज वाहिन्या, सिंगल फेज व थ्री फेजचे नवीन मीटर देखील पूरग्रस्त भागात उपलब्ध करून दिले आहेत. अनेक पाणीपुरवठा योजना, प्राथमिक आरोग्य केंद्रे, रुग्णालये, घरगुती ग्राहकांना प्राधान्याने पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे. 

उपकार्यकारी अभियंता श्री. पवार म्हणाले, तालुक्‍यात अतिवृष्टी व पुरामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब पडले आहेत. गरजेच्या ठिकाणी अन्य मार्गाने पर्यायी विद्युत पुरवठा सुरू करण्यात आला आहे. गरजेच्या ठिकाणी ठेकेदारामार्फत युद्धपातळीवर कामे सुरू केली आहेत. महूद परिसरात सर्वांत जास्त नुकसान झाले आहे. तालुक्‍यातील सर्वच ठिकाणचा नुकसानीमुळे खंडित झालेला विद्युत पुरवठा सुरू केला जाईल. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM kisan 22nd Installment : पंतप्रधान मोदी आज 'पीएम किसान' चा २२ वा हप्ता जारी करणार; तुमच्या खात्यात पैसे येणार की नाही? असं चेक करा

Phaltan News: पाइपमध्‍ये अडकून तिघांचा मृत्‍यू; फलटण तालुक्यातील पाेटपाटातील घटना, तिघेही ओरिसातील पाेल्‍ट्री कामगार, काय घडलं!

Dharashiv News: उमरग्यात गॅससाठी लांब रांगा; बुकिंग केल्यानंतरही १५ दिवस प्रतीक्षा;सिलिंडर उशिरा मिळत असल्याने ग्राहक त्रस्त

Parbhani Gas Booking Trouble: गॅस सिलिंडर बुकिंग सर्व्हर डाउन, ऑनलाइन नोंदणी ठप्प, परभणी गॅस एजन्सी गर्दी

बोर्डाचे शिक्षकांना आदेश! दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणी शाळेतच बंधनकारक; २१ दिवसांसाठी २१ दिवसांची मुदत, आता उत्तरपत्रिकांचे गठ्ठे इतिहासजमा

SCROLL FOR NEXT