Facebook_Vaccin 
सोलापूर

आता फेसबुक देणार कोव्हिड व्हॅक्‍सिनेशनसंबंधी अपडेट माहिती ! लवकरच होणार फीचर्स लॉंच

अनुराग सुतकर

सोलापूर : सध्या कोरोना महामारीमुळे संपूर्ण जगाचे लक्ष कोरोना लसीसंदर्भात असणारी उपलब्धता आणि पुरवठा याकडे लागले आहे. त्यातूनच कोव्हिड लस मिळवण्यासाठी उत्सुक असलेल्या जगभरातील कित्येक दशलक्ष लोकांना एक पाऊल जवळ आणण्यासाठी फेसबुक एक जागतिक मोहीम राबवीत आहे. 

पूर्वी फेसबुकने दोन अब्जहून अधिक लोकांना अधिकृत कोव्हिड -19 माहितीशी कनेक्‍ट केले आहे. आता जगातील बहुतांश देश सर्व प्रौढांच्या लसीकरणासाठी प्रयत्नशील आहेत. तसेच प्रत्येकासाठी लसीकरण सुलभ व्हावे यासाठी फेसबुक टीम एका फीचरवर कार्य करीत आहे. यातून आपल्याला लस कधी आणि कुठे मिळेल याबाबत माहिती मिळेल. 

ही कोव्हिड माहिती केंद्रातील अपडेट माहिती न्यूज फीडमार्फत आपणाला मिळणार आहे. तसेच लोक लसीकरण केंद्र शोधण्यासाठी फेसबुकचा वापर करत असल्याचे फेसबुकला लक्षात आले. म्हणून फेसबुक या सेवेसाठी विशेष प्रयत्न करणार आहे. 

तसेच इन्स्टाग्रामवरसुद्धा कोन्व्हिड इन्फॉर्मेशन सेंटर आणत आहे; जेणेकरून इन्स्टाग्राम युजर्ससुद्धा या सेवेचा लाभ घेतील. यातील विशेष बाब म्हणजे लसीकरणाच्या नोंदणीसाठी राज्य व शहर पातळीवरील आरोग्य अधिकारी आणि सरकार यांच्याशी व्हॉट्‌सऍपद्वारे समन्वयसुद्धा साधले जाणार आहे. त्यामुळे लसीकरणाची अद्ययावात माहिती मिळवण्यात सुद्धा मदत होईल, हे मात्र नक्की. यासंबंधीची सर्व अधिकृत माहितीही फेसबुकचे मार्क झुकेरबर्ग यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून दिली आहे. 

युजर्सना याचा फायदा काय? 

  • लसीकरण कोठे आणि केव्हा होईल ते शोधण्यास मदत करणे 
  • आपणाला लस मिळण्यासाठी जवळपासची ठिकाणे ओळखण्यात मदत 
  • अपॉईंटमेंटची वेळ, संपर्क माहिती आणि भेटीसाठी लिंक समाविष्ट आहेत 
  • घरबसल्या लसीची उपलब्धता आणि वितरण कळेल 
  • इन्स्टाग्रामवरील युजर्सनाही ही सेवा उपभोगता येणार आहे 
  • आरोग्य अधिकारी आणि सरकारकडे लसींसाठीची अधिकृत माहिती आणि उपलब्धता याची माहिती सुद्धा लोकांना कळणार असल्याने लसीकरण नोंदणी करण्यास अडचण येणार नाही 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भिवडी येथे कारखान्यात भीषण स्फोट; सात ठार, बेकायदा फटाके निर्मिती सुरू असल्याचा दावा

Pune Crime : पोलिसांकडून आंतरराज्यीय टोळी उद्ध्वस्त, सव्वाचार कोटींचे मेफेड्रोन जप्त

Latest Marathi News Update : भिवंडीत महापौर पदाच्या उमेदवारीसाठी न्यायालयाची अटी-शर्तींसह मुभा

Sunetra Pawar: शाळांना अल्पसंख्याक दर्जा प्रकरण! सुनेत्रा पवारांनी उचललं कठोर पाऊल; आढावा बैठकीत निर्देश

Pahalgam Tourist Places Reopen : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर बंद केलेली १४ पर्यटनस्थळे पुन्हा सुरू होणार!

SCROLL FOR NEXT