PDR_NCP 
सोलापूर

तयारी विधानसभा पोटनिवडणुकीची ! पंढरपूर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसची नूतन कार्यकारिणी जाहीर 

भारत नागणे

पंढरपूर (सोलापूर) : विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पंढरपूर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळिराम साठे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यात नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. 

या वेळी राज्य उपाध्यक्ष शफीभाई इनामदार, जिल्हा उपाध्यक्ष युवराज पाटील, "विठ्ठल'चे चेअरमन भगीरथ भालके, युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील, तालुकाध्यक्ष ऍड. दीपक पवार, शहराध्यक्ष सुधीर भोसले, जिल्हा संघटक नरहरी देशमुख, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष प्रा. मारुती जाधव, डॉक्‍टर सेलचे जिल्हाध्यक्ष अमरजित गोडसे, पदवीधर जिल्हाध्यक्ष सुग्रीव कोळी, संकेत ढवळे, ओबीसी जिल्हाध्यक्षा साधना राऊत, महिला अध्यक्षा अनिता पवार, शहराध्यक्षा संगीता माने, श्रीकांत शिंदे, चारुशीला कुलकर्णी, राधा मलपे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

तालुका कार्यकारिणीमध्ये प्रवीण भोसले व अनिल मोरे यांची कार्याध्यक्ष म्हणून तर उपाध्यक्षपदी रणजित लामकाने, संतोष नाईकनवरे, रावसाहेब नागणे, बाळासाहेब जाधव, संजय बाबर, दिलीप साळुंखे यांची निवड करण्यात आली. 

मुख्य संघटक पदी समीर मोरे, संघटक पदी चंद्रकांत जाधव, चंद्रकांत महाडिक, रवींद्र देठे, सिद्धेश्वर पवार, शरद पाटील यांची तर सरचिटणीस पदी मारुती पोरे, उत्तम घाडगे, 
धोंडीराम घोलप, नेताजी कडलासकर, महिला आघाडीच्या कार्याध्यक्षपदी भाळवणी येथील राजेश्री ताड यांची निवड करण्यात आली. 

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी शहाजी मुळे व सरचिटणीसपदी रमेश चिखलकर, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी संतोष चव्हाण तर कार्याध्यक्षपदी बालाजी आटकळे व बालाजी कवडे यांची निवड करण्यात आली. 

उपाध्यक्ष म्हणून अमोल नागणे, नवनाथ आसबे, हनुमंत बागल यांची निवड करण्यात आली. संघटक पदी सुहास काळे, सचिन देठे- पाटील, शिवाजी नाईकनवरे, धनाजी डोंगरे, संजय शिंदे, सदाशिव भाटेकर, सारंग महामुनी यांची निवड करण्यात आली. सरचिटणीसपदी औदुंबर चव्हाण, अजिंक्‍य सपाटे, नीलेश गंगणमले, पवन पाटील, सतीश जाधव यांची वर्णी लागली आहे. 

ओबीसी सेलच्या तालुकाध्यक्षपदी अरुण पांढरे, कार्याध्यक्षपदी गोपाळ शिंदे, उपाध्यक्ष किशोर खरडकर, अरुण शिंदे यांची निवड करण्यात आली. पदवीधर सेलच्या तालुका अध्यक्षपदी संजय डुबल, कार्याध्यक्षपदी समाधान चव्हाण, शरद चव्हाण, उपाध्यक्षपदी सचिन नकाते यांची तर डॉक्‍टर सेलच्या तालुका अध्यक्षपदी अमृता पवार यांची निवड करण्यात आली आहे. किसान सेलच्या कार्याध्यक्षपदी बाळासाहेब पाटील, जिल्हा उपाध्यक्षपदी विठ्ठल मासाळ सेवादल सेलच्या तालुका उपाध्यक्षपदी संतोष इनामदार यांची निवड करण्यात आली आहे. 

निवडीनंतर मान्यवरांच्या हस्ते नियुक्तिपत्र देऊन नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Customs Duty: भारतातून आणलेल्या सामानावरील शुल्क सवलत वाढली! नेपाळ सरकारचा मोठा निर्णय; सीमेलगतच्या नागरिकांना मोठा फायदा

Krunal Pandya: हार्दिक आणि कृणालमध्ये खरंच दुरावा आला आहे? अखेर मोठ्या भावानेच सांगितले संपूर्ण सत्य, म्हणाला आमच्यात वाद...

Ghodegaon Crime : जुन्या वादातून आयटीआय वसतिगृहात तरुणाला संपविले; पोलिसांकडून काही तासांतच आरोपीला बेड्या

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात गावी गेलेल्या कुटूंबाचा टेम्पोखाली चिरडून मृत्यू

Mumbai News: दिल्लीतील अग्निकांडानंतर मुंबई फायर ब्रिगेड सतर्क, हॉटेलांवर 'अग्निशमन'ची करडी नजर

SCROLL FOR NEXT