"कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना आता बोन-डेथचा धोका!'  Canva
सोलापूर

'कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना आता बोन-डेथचा धोका!'

"कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना आता बोन-डेथचा धोका!'

मोहन काळे

मुंबईतील के. ई. एम. रुग्णालयातील डॉ. एस. मोहंती यांच्याकडे पोस्ट कोविड बोन-डेथचे दररोज एक-दोन रुग्ण आढळत आहेत.

रोपळे बुद्रूक (सोलापूर) : कोरोनातून (Covid-19) बरे झालेल्या रुग्णांना आता बोन-डेथचा (bone-death) धोका वाढला आहे. त्यामुळे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी तज्ज्ञ डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन पंढरपूर (Pandharpur, Solapur) येथील अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. प्रशांत निकम (Dr. Prashant Nikam) यांनी "सकाळ'शी बोलताना केले. डॉ. निकम म्हणाले, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पोस्ट कोविड आजारांमध्ये विशेषतः काळी बुरशी (Black fungus) म्युकरमायकोसिस (Mucormycosis), डायबेटीस (Diabetes), रक्त गुठळीचे आजार, हृदय तसेच फुफ्फुसाच्या आजारांचे (Diseases of heart and lungs) प्रमाण खूप वाढले आहे. अशातच आता कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांना बोन-डेथ अर्थात ए. व्ही. एन. (Avasular Necrosis) या आजाराचे एक नवीन आव्हान पेशंट व वैद्यकीय तज्ज्ञांसमोर उभे आहे.

मुंबईतील के. ई. एम. रुग्णालयातील डॉ. एस. मोहंती यांच्याकडे पोस्ट कोविड बोन-डेथचे दररोज एक-दोन रुग्ण आढळत आहेत. मुंबई येथील हिंदुजा रुग्णालयातील अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. संजय अगरवाल यांनी पोस्ट कोविड बोन-डेथच्या खात्री झालेल्या पेशंटची माहिती संशोधनाद्वारे प्रसिद्ध केली आहे. या वेळी त्यांनी या आजारात रुग्णाच्या मांडीचे हाड कुजत असल्याचे सांगितले.

लक्षणे, कारणे अन्‌ घ्यायची काळजी

  • बोन-डेथ आजाराची लक्षणे : मांडी व खुबा दुखणे, सांधा झिजणे, सांध्याची लवचिकता कमी होणे, सांध्यांना कडकपणा येणे, सांध्यांची हालचाल मंदावणे, पायाला वेदना होणे, चालताना तंगडणे

  • बोन-डेथ आजाराची कारणे : हाडांचा रक्तपुरवठा खंडित होणे, कोरोना आजारात जीवरक्षक स्टिरॉईड औषधांचा अतिरेक

  • पोस्ट कोविड रुग्णांनी घ्यावयाची काळजी : कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी बोन-डेथचा आजार होऊ नये म्हणून जवळच्या अस्थिरोग व सांधेतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत विशेषतः तरुणांमध्ये पोस्ट कोविड बोन-डेथचा धोका अधिक आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे कोरोना व्हायरसमुळे रक्तगुठळीचे प्रमाण वाढणे व जीवरक्षक स्टिरॉईड औषधांचा जास्त वापर हा असू शकतो. त्यामुळे कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांनी लक्षणे दिसताच वेदनाशामक औषधे घेऊन वेळ न घालवता अस्थिरोग तज्ज्ञांकडून पोस्ट कोविड बोन-डेथ तर नाही ना हे जाणून उपचार घेणे गरजेचे आहे.

- डॉ. प्रशांत निकम, अस्थिरोग व सांधेरोपण तज्ज्ञ, पंढरपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejas Express: तेजसच्या प्रवासात मोदकांचा गोडवा! गणेशोत्सवात भाविकांसाठी आयआरसीटीसीची खास मेजवानी

India vs Japan: टीम इंडिया 'सुझुकी कप'साठी जपानच्या दौऱ्यावर; कधी खेळला जाणार ऐतिहासिक सामना? BCCI कडून घोषणा

पार्किंगमध्ये स्ट्रेचरवर आईचा मृतदेह अन् बाजूला बसलेला हताश बाप; झाशीच्या वैद्यकीय महाविद्यालयात हृदयद्रावक घटना

Marathi News Live Updates : अमरावतीत अल्पवयीन तरुणीची हत्या प्रकरण, आरोपीला ८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

Maratha Reservation : सकल मराठा समाजाच्या वतीने पुणे-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर आष्टामोड येथे ‘रास्ता रोको’ आंदोलन

SCROLL FOR NEXT