सोलापूर

सोलापुरातून `या` हवाई वाहतुकीला परवानगी

विजयकुमार सोनवणे


सोलापूर - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॅाकडाऊनमुळे सोलापूर महापालिका क्षेत्रात आजपासून (शुक्रवार) सायंकाळी सात ते दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे. मात्र वैद्यकीय सेवा हवाई अॅम्बुलन्सला परवानगी असणार आहे. तसेच संचारबंदीच्या आदेशातून अत्यावश्यक सेवांना यातून वगळण्यात आले आहे. महापालिकेचे आयुक्त दीपक तावरे यांनी काल (गुरुवारी) रात्री उशीरा हे आदेश काढले आहेत. 

आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत आतापर्यंत ग्रामीण भागासाठी जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्तालय हद्दीसाठी पोलिस आयुक्त आदेश काढत होते. महापालिका क्षेत्रासाठी पहिल्यांदाच आयुक्तांनी आदेश काढले आहेत. या आदेशातील तरतुदी आज मध्यरात्री 12 वाजून एक मिनिटांपासून ते 31 मे च्या मध्यरात्री 12 पर्यंत लागू राहणार आहेत. 

महापालिका क्षेत्रासाठी आदेशातील महत्वाच्या तरतुदी
- देशी व आंतरराष्ट्रीय हबाई वाहतुकीला बंदी. तथापि केंद्रीय गृहमंत्रालयाने सुरक्षेसाठी सवलत दिलेल्या बाबी आणि वैद्यकीय हवाई अॅम्बुलन्सला परवानगी असणार आहे. 
- सुरक्षेच्या कारणाशिवाय रेल्वेतून प्रवासाला बंदी
- सर्व शैक्षणिक व प्रशिक्षण संस्था बंद, अॅानलाईन व दूरस्थ शिक्षण सेवा सुरु राहणार
- बसस्थानक, रेल्वे स्थानक आणि विमानतळावरील कॅन्टीन सुरु राहतील, इतर ठिकाणची अतिथ्य सेवा मात्र बंद असणार आहेत.
- चित्रपटगृहे, मॅाल्स, खरेदी संकुले, व्यायाम शाळा,क्रीडा संकुले, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, सभागृहयासह सार्वजनिक ठिकाणे बंद राहतील.
- सर्व सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांवर बंदी असेल. सर्व धार्मिक स्थळे व प्रार्थना स्थळे नागरिकांसाठी बंद राहतील. अशा ठिकाणी धार्मिक एकत्रिकरणाला कडक निर्बंध असणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Wani Crime : मायेने घरात ठेवले, घासातला घास दिला; त्याच भाडेकरूने जीव घेतला...!

Roasted Poha Namkeen: डाएट करताय? मग नक्की ट्राय करा कमी तेलातले 'रोस्टेड पोहा नमकीन'; वजन कमी करण्याच्या प्रयत्नात ठरेल फायदेशीर!

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

SCROLL FOR NEXT