"ओ शेठ... तुम्ही एवढ्यातूनही जाताय थेट !' Canva
सोलापूर

'ओ शेठ... तुम्ही एवढ्यातूनही जाताय थेट !'

"ओ शेठ... तुम्ही एवढ्यातूनही जाताय थेट !'

दत्तात्रय खंडागळे

सांगोला तालुक्‍यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सध्या लॉकडाउन सुरू करण्यात आला आहे.

सांगोला (सोलापूर) : दुपारची वेळ... सांगोला (Sangola) तालुक्‍यातील कोरोनाच्या (Covid-19) वाढत्या रुग्णसंख्येमुळे सध्या लॉकडाउन (Lockdown) सुरू करण्यात आला आहे. कामाशिवाय बाहेर फिरणाऱ्यांवर सांगोला पोलिसांची (Sangola Police) करडी नजर होती. पोलिस कारवाई (Police Action) करत असले तरीही अनेक जण रस्त्यावरून फिरताना दिसत होते. एक मोटारसायकलस्वार डबल सीट पोलिसांच्या समोरच मास्क (Mask) न लावता (त्यातील एकाने) बंदी असतानाही तसाच चाललेला दिसला. त्या वेळी पोलिसांनी लगेचच त्याला थांबण्याचा इशारा केला व तो जवळ येताच म्हणाले, "ओ शेठ... तुम्ही एवढ्यातूनही जाताय थेट!'. त्याच वेळी पोलिसांपासून थोडं दूर असलेला पाठीमागे बसलेला लगेच म्हणतो, "आमचा नादच असतो थेट!' यांच्या बोलण्यातून पोलिसांच्या कारवाईपेक्षा "ओ शेठ' या गाण्याचाच प्रभाव दिसून आला.

सांगोला तालुक्‍यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सध्या लॉकडाउन सुरू करण्यात आला आहे. तालुक्‍यात 10 हजार 491 कोरोना रुग्ण बरे झाले असून एक हजार 17 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत शासकीय आकडेवारीनुसार 144 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील पाच तालुक्‍यांमध्ये वाढत्या रुग्णसंख्येमध्ये सांगोल्याचा समाविष्ट असल्याने येथे निर्बंध घालण्यात आले आहेत. निर्बंध असले तरी अनेकजण रस्त्यावरून अजूनही मोकाटपणे फिरताना दिसत आहेत. प्रशासनातील महसूल, पोलिस व नगर विकास विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्रित येत मोकाट फिरणाऱ्यांविरोधात तसेच नियम न पाळणाऱ्या व्यावसायिकांच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. प्रशासनाद्वारे कारवाई होत असली तरी अनेक जण या कारवाईला जुमानत नाहीत. पोलिसांसमोरच नियम मोडून जाताना दिसतात.

"ओ शेठ'चा बोलण्यातूनही प्रभाव

"ओ शेठ, तुम्ही नादच केलाय थेट,

ओ शेठ, तुम्ही माणूस हाय लई ग्रेट!'

सध्या हे गाणे प्रसिद्धीच्या शिखरावर असून अनेकांच्या ओठांवर गुणगुणताना दिसते. याची प्रचिती कारवाई करतानाही पोलिसांकडून किंवा पाठीमागे बसलेल्या त्या व्यक्तीच्या बोलण्यातून दिसून आले. गाण्याच्या आधार घेत पोलिस सांगत होते की, "ओ शेठ तुम्ही एवढ्यातूनही जाताय थेट!' परंतु पाठीमागे बसलेला परंतु मास्क लावलेला त्यांच्या बोलण्याच्या आधारावरच "ओ शेठ, आमचा नादच असतो थेट' असे सहज बोलून गेला. विनाकारण, विनामास्क फिरणाऱ्यांविरोधात कारवाई करणाऱ्या पोलिसांपेक्षा अन्‌ कारवाई झालेल्या व्यक्तींवरील कारवाईपेक्षा गाण्यातून झालेल्या संवादामुळे लोकांचा टाईमपास मात्र नक्की झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Level : ...अखेर दिलासादायक बातमी! तळ गाठणारे कोयना धरण पुन्हा भरणार; महाबळेश्वर-नवजातील पावसाने पाणीसाठ्यात मोठी वाढ, पाहा ताजी आकडेवारी

अभिनेत्रीसोबत भररस्त्यात गैरवर्तन; बहिणीसमोरच अनोळखी व्यक्तीचं लाजिरवाणं कृत्य, अभिनेत्रीने सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळी वाजवा आंदोलन

T20 Series : वैभव सूर्यवंशीचं आज पदार्पण? कुणाला बाहेर बसवणार? इंग्लंडविरुद्ध पहिला टी२० सामना, भारताची परीक्षा

Mumbai Local: माकडाच्या हट्टापुढे रेल्वेही थांबली! बोरिवलीत रेल्वे वाहतूक विस्कळीत

SCROLL FOR NEXT