Gamblers 
सोलापूर

अक्कलकोट येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा ! रोख रकमेसह साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त

चेतन जाधव

अक्कलकोट (सोलापूर) : शहरातील खुल्या जागेत विजेच्या प्रकाशात सुमारे 24 संशयित आरोपींनी रिंगण करून मन्ना नावाचा हार-जीत जुगार खेळत असताना पोलिसांनी धाड टाकली. या धाडीत एक लाख 23 हजार 330 रुपयांच्या रोख रकमेसह नऊ मोटारसायकली असे एकूण सात लाख 53 हजार 330 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही धाड सोलापूर ग्रामीणच्या विशेष पोलिस पथकाने रविवारी (ता. 1) सायंकाळी सहा वाजता टाकली. याबाबत उत्तर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी, की या धाडीची फिर्याद पोलिस कॉन्स्टेबल कल्याण विठ्ठल भोईटे (वय 44, नेमणूक पोलिस मुख्यालय, सोलापूर ग्रामीण विशेष पथक) यांनी उत्तर पोलिस ठाण्यात दिली आहे. संशयित आरोपी सत्तार सिकंदर गवंडी (वय 37, रा. अक्कलकोट), रमजान हगलदिवटे (वय 38, रा. अक्कलकोट) यांच्यासह सुमारे 24 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याजवळील एक लाख 23 हजार 330 रुपये रोख रकमेसह नऊ मोटारसायकली सुद्धा जप्त करण्यात आल्या आहेत. रोख रक्कम, नऊ मोटारसायकली व जुगार साहित्य असे एकूण 7 लाख 53 हजार 330 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. 

धाड टाकण्यात आलेल्या विशेष पोलिस पथकामध्ये विशेष पोलिस पथकाचे पोलिस निरीक्षक विनय बहीर, पोलिस कॉन्स्टेबल मदने, झिरपे आदींचा समावेश होता. उत्तर पोलिस ठाण्याच्या पोलिसांच्या मदतीने ही धाड टाकण्यात आली. 24 संशयित आरोपींवर विविध कलमान्वये उत्तर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा अधिक तपास पोलिस निरीक्षक कल्लप्पा पुजारी हे करीत आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elon Musk: अंतराळात डेटा सेंटर, जमिनीवर एआयचा विस्तार! काय आहे एलॉन मस्क यांचा जगाला धडकी भरविणारा मास्टर प्लॅन?

आमचे हात बांधलेले नाहीत, निवडणूक प्रक्रियेत गडबड केल्यास शांत बसणार नाही, सर्वोच्च न्यायालयाची मोठी टिप्पणी!

Soybean Farm Fire : दुष्काळात कष्टाने जगवलेले पाच एकरवरील सोयाबीन जळून खाक; जाणीवपूर्वक आग लावल्याचा शेतकऱ्याचा संशय

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

अमरावतीत पोलीस शिपायाच्या मृत्यूने खळबळ; टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी लिहिली चिठ्ठी, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT