वारणेत १२ टीएमसी पाणी sakal
सोलापूर

Pune Water News : पुण्यातील पावसाने उजनीत येणार पाच टीएमसी पाणी

दौंडवरून ३५०० क्युसेकचा विसर्ग; उजनीतून सोडलेले पाणी शुक्रवारी थांबविणार

Chinmay Jagtap

Pune Water News: पुणे जिल्ह्यात दोन दिवसांपासून पडलेल्या पावसामुळे सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणात पाच टीएमसी पाणी येणार आहे. त्यामुळे सोलापूर, पंढरपूरसाठी जेवढे पाणी सोडले, तेवढेच पाणी पुन्हा धरणात येणार असल्याचा दिलासा मानला जात आहे.

यंदाचा पावसाळ्याचा शेवट आता अवघ्या काही दिवसांवर आलेला असतानाही उजनी धरणातील पाणीसाठा २५ टक्क्यांवर गेलेला नाही. सोलापूर जिल्ह्यातील दोन लाख हेक्टरवरील पिकांना उजनीचा आधार आहे. दुसरीकडे १००हून अधिक ग्रामपंचायतींसह सोलापूर, धाराशिव, कर्जत-जामखेड व सोलापूर जिल्ह्यातील काही नगरपालिका व पुणे, सोलापूर जिल्ह्यातील एमआयडीसींनाही उजनीचाच आधार आहे.

सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या छायेत आहे. परंतु, पुणे जिल्ह्यात तीन दिवसांपासून समाधानकारक पाऊस सुरु असल्याने सध्या उजनीत दौंडवरून साडेतीन हजार क्युसेक विसर्गाने पाणी येत आहे. त्यामुळे पुढील दोन-तीन दिवसांत धरणात पाच टीएमसीपर्यंत पाणी येईल आणि धरण पुन्हा २५ टक्के होईल,

असा विश्वास लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, उजनीतून सोलापूर, पंढरपूरसाठी सोडलेले पाणी आता २९ सप्टेंबरला बंद केले जाणार आहे. त्यानंतर धरणातील पाणी पिण्यासाठीच राखीव ठेवले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs DC Live: टीम डेव्हिडचा पराक्रम, SIX पाहून भारी होती विराटची रिअ‍ॅक्शन; पण, कृणाल पांड्या का संतापला? Video Viral

TCS प्रकरणानंतर आणखी एक धक्कादायक घटना! तुळशी माळ काढून महिलेला दारू-सिगारेट पाजली; नंतर धमकी देत धर्मांतर अन् अत्याचार

आयुष्यात काही तरी कमी पडतंय... मराठमोळ्या अभिनेत्रीची इंस्टापोस्ट व्हायरल, मोठा निर्णय घेत म्हणाली-

RCB vs DC Live: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या वाघांची 'शेळी' झाली! दिल्ली कॅपिटल्सने भन्नाट गोलंदाजी केली; दोनशेपार जाणारा संघ ढेपाळला

Latest Marathi News Live Update: नाशिकमध्ये धर्मांतरण आणि महिला शोषण प्रकरणात नवा वळण

SCROLL FOR NEXT