logo 
सोलापूर

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा 5 ऑक्‍टोबरपासून 

प्रमोद बोडके

सोलापूर : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा 5 ते 29 ऑक्‍टोबर 2020 दरम्यान घेण्याचे नियोजन करण्यात आले असून यासंदर्भात येत्या दोन दिवसात विद्यापीठाच्या संकेतस्थळावर वेळापत्रक जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक सीए श्रेणिक शहा यांनी सांगितले. 

विद्यापीठ अनुदान आयोग, महामहिम राज्यपाल आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे. यानुसार ऑक्‍टोबरमध्ये परीक्षा होतील, सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यासाला लागून परीक्षेची तयारी करावी. परीक्षेचे स्वरूप हे घरी राहूनच ऑनलाईन पद्धतीने राहणार असून यासाठी संबंधित महाविद्यालयांकडून प्रकाशित होणारा गुगल फॉर्म विद्यार्थ्यांनी 15 सप्टेंबर 2020 पूर्वी भरून देणे अपेक्षित आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा देता येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाइनची सुविधा उपलब्ध होणार नाही, अशा विद्यार्थ्यांना अपवादात्मक परिस्थितीमध्येच ऑफलाईन परिक्षा देण्याची सुविधा राहणार आहे. परंतु त्याचे कारण विद्यार्थ्यांना गुगल फॉर्ममध्ये द्यावे लागणार आहे. अंतिम वर्षातील सर्व विद्यार्थ्यांना गुगल फॉर्म भरावा लागणार आहे. संबंधित महाविद्यालये हा गुगल फॉर्म भरुन घेण्याची सोय विद्यार्थ्यांना लवकरच उपलब्ध करून देणार आहेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Overhead Cable : ओव्हरहेड केबल धोरणाला स्थायीची मान्यता; अनधिकृत केबल वर्षभरासाठी होणार नियमित

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT