Guru Vathare news.jpeg 
सोलापूर

नाट्य कलावंतासमोर रोजगाराचा प्रश्‍न : नाट्यगृहांच्या भाड्यात सवलत देण्याचे नाट्य व्यावसायिकांचे महापालिका आयुक्तांना निवेदन 

अरविंद मोटे

सोलापूर : सात आठमहिन्यांपासून प्रयोग बंद असल्याने नाट्य कलावंतासह लाखो कारागिर बेरोजगार आहेत. संपूर्ण रंगभूमी बंद असल्याने नाट्यक्षेत्रावर अवलंबून असलेल्या नाट्य कारागिरांसमोर रोजगाराचा प्रश्‍न उभा असून हे बंद होण्यासाठी सोलापूर नाट्यसेवा संघ आणि अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद सोलापूर उपनगरीय शाखेच्या वतीने गुरुवारी सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिराचे भाड्यात 75 टक्के सवलत मिळावी व डिपॉझिटची अट रद्द करावी या मागणीचे निवेदन महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांना देण्यात आले. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रातील सर्व नाट्यगृहांना 50 टक्के आसन क्षमतेची अट घालण्यात आली आहे. यामुळे लॉकडाउन काळातील सात ते आठ महिने बंद असलेले मनोरंजन क्षेत्र अधिकच अडचणीत येणार आहे. मागील सात आठमहिन्यांपासून प्रयोग बंद असल्याने नाट्य कलावंतासह लाखो कारागिर बेरोजगार आहेत. संपूर्ण महाराष्ट्रासह गोवा, बेळगाव, इंदोर आदी ठिकाणीच्या नाट्य रसिकांची भूक भागविणारे लाखो नाट्य कलावंत मागील सात आठ महिन्यांपासून बेरोजगार आहेत. मागील आठ महिन्यात नाट्य प्रयोग बंद असल्याने तसेच पुढील प्रयोगांची कोणतीही शाश्‍वती नसल्याने नाट्य लाखोच्या संख्येने नाट्य कारागिरांवर उपासमारीची वेळ आली आहे. 

कोरोनामुळे लॉकडाउन काळापासून सर्व नाट्य प्रयोग बंद आहेत. व्यावसायिक रंगभूमीला कुलूप लागले आहे. मागील अनेक दिवसात सर्व ठिकाणच्या यात्रा जत्राही बंद आहेत यामुळे कोणत्याही ठिकाणच्या यात्रेत अथवा समारंभासाठी होणारे सर्व प्रयोग बंद आहेत. यामुळे नाट्य कलावंतासह नेपथ्यकार, रंगभूषा, वेशभूषाकारे तसेच नाट्य आयोजक या सर्वांवर उपासमारीची वेळ आली आहे. 

16 नोव्हेबंरपासून नाट्यगृहे सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे मात्र, पन्नास टक्के आसन क्षमतेमुळे नाट्य व्यावसायिकांसमोर अर्थिक प्रश्‍न उभा राहणार आहे. त्यामुळे नाट्यगृहांच्या भाड्यात 75 टक्के सवलत द्यावी, तसेच अनामत रकमेची अट रद्द करण्यात यावी अशी मागणी नाट्य परिषद व नाट्य व्यावासायिक संघाकडून सातत्याने होत आहे. यावेळी आयुक्त पी. शिवकशंकर यांनी या मागणीचा सकारात्मक विचार करू, असे आश्वासन दिले. याप्रसंगी सोलापूरचे नाट्य व्यसायिक गुरू वठारे, शिवाजी उपरे, विजय साळुंखे, प्रशांत बडवे व जयप्रकाश कुलकर्णी उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai port oil tanker arrival: होर्मुझचा धोकादायक मार्ग पार करत पहिले तेलवाहू जहाज मुंबई बंदरात दाखल! व्हिडिओ पाहा...

Gas Cylinder Shortage: विद्यार्थ्यांच्या मेसवर टांगती तलवार! सिलिंडरच्या टंचाईने जेवणाचे दर वाढले

Latest Marathi News Live Update : आखाती युद्धाचा फटका; टरबूज उत्पादक शेतकरी अडचणीत

Nanded Student Protest: शिक्षणाच्या बाजारीकरणाविरोधात नांदेडमध्ये ‘अभाविप’चा विद्यार्थी आक्रोश मोर्चा

Sangamner News: संगमनेरमध्ये गॅससाठी एजन्सीबाहेर नागरिकांच्या रांगा; कमर्शियल सिलिंडर मिळत नसल्याने हॉटेल व्यावसायिक संकटात!

SCROLL FOR NEXT