The question of sowing in front of farmers buying new oxen 
सोलापूर

जनावरांचे बाजार बंद; नवीन बैल खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर पेरणीचा प्रश्‍न 

सकाळ वृत्तसेवा

मंगळवेढा (सोलापूर) : सलग दुसऱ्या दिवशी आज मंगळवेढा तालुक्‍यात पावसाने सर्वदूर हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या खरिपासाठी आशा पल्लवित झाल्या. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे गेल्या तीन महिन्यांपासून जनावरांचा बाजार बंद आहे. त्यामुळे खरिपात मशागतीसाठी नवीन बैलाची खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर पेरणी कशी करायची असा प्रश्‍न उभा राहिला आहे. 
कोरोनाच्या संकटामुळे गेल्या तीन महिन्यांपासून जनावरांचा बाजार बंद आहे. काही शेतकऱ्यांनी उन्हाळ्यातच आर्थिक अडचणीमुळे बैल विकून टाकले आहेत. त्यामुळे आता खरीप पेरणीसाठी ज्या शेतकऱ्यांना नवीन बैल खरेदी करायचे आहेत त्या शेतकऱ्यांना गेल्या तीन महिन्यांपासून बाजार बंद असल्यामुळे नवीन बैलाची खरेदी कशी करायची असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे पेरणीच्या तोंडावर अडचणी निर्माण झाल्या आहेत. 
तरीही बैल उपलब्ध असलेले काही शेतकरी आपली पेरणी झाल्यानंतर भाड्याने पेरणी करायला जातात. त्यामुळे काही शेतकऱ्यांची सोय होणार आहे. तरीही सध्या शेतकऱ्यांना खरिपाच्या पेरणीसाठी ट्रॅक्‍टर पेरणी करण्याचा पर्याय आहे. मात्र अल्पभूधारक शेतकरी बैल पेरणीलाच पसंती देतात. खरीप पेरणीसाठी चडचण, उमदी, जवळा, सांगोला, पंढरपूर याठिकाणी बैलांच्या खरेदी-विक्रीसाठी शेतकरी जात असतात. मात्र यंदा बाजार बंद असल्याने बैलाची खरेदी करता आली नाही. 
गेल्या तीन महिन्यांपासून शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणी मोठ्या प्रमाणात उभा राहिल्याने उत्पादित मालाला चांगला दर मिळू शकला नसल्याने कवडीमोल दराने माल विकावा लागला. तर काही शेतकऱ्यांनी फळपिके बांधावर टाकून दिली. गतवर्षीच्या खरिपातील तालुक्‍यातील जवळपास 19 हजार शेतकऱ्यांना तुरीचा विमा नाकारल्यामुळे त्या शेतकऱ्यांना खरीप पेरणीसाठी आता कर्ज काढण्याची वेळ आली. तालुक्‍यात अरळी येथील बॅंकेत पीक कर्ज दिले जात नसल्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला. काही राष्ट्रीयकृत बॅंका ऊस, डाळिंब, द्राक्षे या पिकाला पीक कर्ज देण्यासाठी आग्रही असतात परंतु खरीप पिकांसाठी मात्र नकारघंटाच दाखवली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pattankodoli ZP Member : राहुल आवाडेंना धक्का, पट्टणकोडोली जिल्हा परिषद सदस्य महेश पाटील यांचे जातवैधता प्रमाणपत्र अवैध; निकालानंतर तरूणांचा जल्लोष

shirur Viral Video: चुलत भावाची डोळ्यात मिरची पूड टाकून दांडक्याने मारहाण, नेमकं काय घडलं?

Mamata Banerjee: ममतांच्या 'तृणमूल'चं काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार का? काँग्रेसच्या बैठकीत नेमकं काय ठरलं?

Uruli Kanchan News : जलतरण तलावात (स्विमिंग पूल) पोहण्यासाठी गेलेल्या एका १३ वर्षांच्या निष्पाप बालकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू

Rohit Sharma: रोहित शर्मा रचणार नवा इतिहास! अफगाणिस्तानविरुद्ध मैदानात उतरताच मोडणार ३७ वर्षांपूर्वीचा 'हा' मोठा पराक्रम

SCROLL FOR NEXT